ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Share market |या शेअरची 1 लाखावरून 1 कोटी रुपये एवढी झाली किंमत; शेअर मार्केटमधील या कंपनीच्या गुंवतवणूकदारांचा कायापालट..

Share market: काही तरी मिळवायचं असल्यास संयम असणे गरजेचे असते. संयम ठेवल्याशिवाय काहीच गोष्टी अशक्य नाहीत. यामुळे प्रत्येक क्षेत्रात संयम असावा. शेअर बाजारातही असच आहे. आपण एखाद्या कंपनीचा एखादा शेअर विकत घेतो. तेव्हा त्याची किंमत त्या कंपनीच्या बाजार मूल्यांवर अवलंबून असते. यासाठी गुंतवणूकदाराला त्याबाबत अभ्यास असावा.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

तनला प्लॅटफॉर्मच्या शेअरची किंमत आणि किंमतीत झालेली वाढ:

तनला प्लॅटफॉर्मच्या (Tanla Platforms) एका शेअरची किंमत एकेकाळी 6.10 रुपये होती, ती आता 744.60 रुपयांपर्यंत वाढली आहे. असे असले तरी मागील एक वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिले नाही.
तनला प्लॅटफॉर्मच्या शेअरची किंमत 39 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

2022 मध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 59.77 टक्क्यांची घसरण झाली. गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांना तब्बल 47 टक्क्यांचा फटका बसला आहे. 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मात्र नफा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षात तनला प्लॅटफॉर्मच्या शेअर्सच्या किंमती 2212 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

26 ऑक्टोंबर 2012 साली एका शेअरची किंमत 6.10 रुपये इतकी होती. गुरुवारी (27 ऑक्टोबर 2022) कंपनीच्या शेअरची किंमत 744.60 रुपयांवर बंद झाली. म्हणजेच 10 वर्षांपूर्वी कंपनीत 1 लाख रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदाराचा परतावा आज 1.20 कोटी रुपयांपर्यंत वाढला.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button