दिनंदीन बातम्या

Stock market scam शेअर बाजारात नव्या घोटाळ्याची धक्कादायक माहिती

Stock market scam मुंबई: शेअर बाजारात एक नवीन प्रकारचा घोटाळा (Scam) उद्भवला असून, गुंतवणूकदारांना सावध राहण्याचे आवाहन झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी केले आहे. खोट्या ट्रेडिंग अॅप्सच्या माध्यमातून हा घोटाळा पसरत असन, या अॅप्स आघाडीच्या ब्रोकर कंपन्यांच्या नक्कल करन गुंतवणूकदारांना फसवत आहेत.

कसे होते हे फसवणूकचे जाळे?

सुरुवातीला, हे खोटे अॅप्स गुंतवणूकदारांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडून घेतात. त्यानंतर, मोठ्या ब्रोकर कंपन्यांसारखे दिसणारे हे अॅप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगतात. सुरुवातीच्या काही काळात, गुंतवणूकदारांना या अॅप्सच्या माध्यमातून नफा मिळतो, ज्यामुळे त्यांना या अॅप्सवर विश्वास वाटू लागतो. पण काही काळानंतर, निधी हस्तांतरीत करण्यास सांगितले जाते. गुंतवणूकदारांना (to investors) प्रथम फी, कर इत्यादी भरण्यास सांगितले जाते आणि नंतर संपूर्ण ग्रुप गायब होतो. अशा प्रकार गुंतवणूकदारांची फसवणूक होते.

वाचा: Stenographer| महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांची मोठी संधी!

सुशिक्षितही होत आहेत बळी

नितीन कामथ यांच्या मते, फक्त सामान्य लोकच नव्ह तर सुशिक्षित लोकही या घोटाळ्यांना बळी पडत आहेत. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी लवकर पैसे कमवण्याच्या आमिषांपासून सावध राहणे गरजेचे.

काय घ्यावी काळजी?

  • कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा ग्रुपकडून आलेल्या ट्रेडिंग अॅप्सला डाऊनलोड करू नका.
  • मोठ्या ब्रोकर कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट्सवरूनच अॅप्स डाउनलोड करा.
  • लवकर पैसे कमवण्याच्या आमिषांवर विश्वास (faith) ठेव नका.
  • जर तुम्हाला असे कोणतेही संशयास्पद अॅप्स आढळले तर त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.

नितीन कामथ यांचा इशारा: खोट्या ट्रेडिंग अॅप्सचा धोका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button