शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी फायदेशीर ठरेल शरद पवार ग्राम समृद्धी योजना; पहा काय आहे योजना..
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे.
योजना कोणती…
‘ मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ‘ हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकरी व मजुरांसाठी चार वयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबवण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस यासाठी पक्का गोठा बांधून देणे ,शेळीपालनासाठी शेड बांधणे , कुक्कुटपालनासाठी शेड बांधने तसेच भूसंजीवनी- नाडेप कंपोस्टिंग या चार वयक्तिक कामाच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येईल.
शेतकरी समृद्ध होईल…
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थीना सार्वजनिक कामे हाती देऊन त्याद्वारे कायमस्वरूपी भत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामा अभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा या योजनेचा हेतू आहे. उपरोक्त कामासाठी आवश्यक असणारे ६०:४० अकुशल कुशल प्रमाण संतुलित राहण्यासाठी महात्मा गांधी ग्राम रोजगार योजनेतील शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे फळबाग लागवड अश्या विविध योजनांच्या संयोजनातून या बाबी घेण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल व शेतकरी समृद्ध होईल.
गाय व म्हैस यासाठी पक्का गोठा बांधणे
जनावरांसाठी गोठ्याची जागा अस्वच्छ असल्याने जनावरांना आजार होण्याची शक्यता असते .ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आणि आवश्यक कागदपत्रे आहेत असे लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल यासाठी ६ गुरांची पूर्वी असलेली तरदूद रद्द करून २ ते ६ गुरे या करीता एक गोठा व त्यापेक्षा अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील.
शेळीपालन शेड बांधणे
शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व मजुरांसाठी हि योजना आहे. किमान २ शेळ्या असलेल्या भूमिहीन शेतकऱ्याला व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येईल. शेळी आणि मेंढ्यांसाठी चांगल्या प्रतीचे शेड बांधने याकरिता एका शेड साठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा लोखंडी सळईचा वापर करून बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांसाठी ३ पट अनुदान मंजूर करण्यात येईल.
ककुक्कुटपालन शेड बांधणे
ककुक्कुटपालन व्यवसायासाठी प्रत्येक शेडला. ४९ हजार ७६० रुपये खर्च अपेक्षित आहे . १०० पक्षी यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या लाभार्थीनी पक्षांची संख्या १५० च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
शेतातील कचरा व सेंद्रिय पदार्थ यापासून खत तयार करण्याची नाडेप ही एक पद्धत आहे . या कंपोस्ट निर्मितीच्या पद्धतीमध्ये शेतात एक खड्डा तयार करतात व त्यामध्ये कचरा, सेंद्रिय पदार्थ व शेणमातीचा थरावर थर देतात .दोन ते तीन महिन्यामध्ये उच्च प्रतीचा कंपोस्ट तयार होतो.या पद्धतीने कंपोस्ट तयार करण्यासाठी हि योजना आहे .या योजनेमध्ये लाभार्थीना या पद्धतीने कंपोस्ट तयार करण्यासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे.
WEB TITLE: Sharad Pawar Gram Samrudhi Yojana will be beneficial for doubling the income of farmers; See what the plan is ..