Crop Insurance | पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम तुटपुंजी मिळत असल्याने स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) आज 5 डिसेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयावर धडक दिली आहे. यंदा अतीवृष्टीमुळे पिकाचे (Crop Damage) प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांची (Agriculture) फसवणूक केली आहे.
वाचा: महत्वाची बातमी! केंद्र सरकार ‘या’ महिलांना देतंय 6 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
शेतकऱ्यांना 100 टक्के भरपाई देण्यात यावी
नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोडकी भरपाई देउन कंपनीने चेष्टा चालु केली आहे. याचाच आक्रोश करीत शेतकऱ्यांनी कृषी कार्यालया समोर प्रचंड घोषणाबाजी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकऱ्यांना 100% पिक विमा मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी प्रशांत डिक्कर यांनी बोलताना सांगितले AIC कंपनीची चौकशी करून कारवाई करावी व शेतकऱ्यांना 100% पिक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा सरकार व विमा कंपनीच्या विरोधात स्वाभिमानी तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नवीन वर्षापूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 13वा हप्ता
शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी
ज्या शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) रक्कम मिळाली नाही, व ज्या शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसान तुलनेत कमी रक्कम मिळाली अशा शेतकऱ्यांनी (Type Of Agriculture) तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रारी देण्यात आल्या. तक्रारीचा तत्काळ निपटारा करुन (Insurance) विमा रक्कम शेतकऱ्यांच्या (Farming) खात्यावर जमा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वाचा:कापसाच्या दराला लग्नसाराईचा आधार! दरात होणार मोठी वाढ, जाणून घ्या काय मिळेल भाव?
कोणकोण होते उपस्थित?
या आंदोलनात तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, उज्वल खराटे, संतोष खेर्डे, सागर मोरखडे, कालिमोद्दीन काजी, धनंजय कोरडे, विशाल चोपडे, विठ्ठल ताठोड, प्रशांत बावसकर, दत्ता डिक्कर, शिवा वरटकार, रोशन देशमुख सह संघटनेचे शेकडो का कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- मोठी बातमी! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन.
- दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी घ्या ‘ही’ खबरदारी; अन्यथा कर्ज येईल अंगलट अन्…
Web Title: Self-respecting organization directly attacked the agriculture office! Give farmers 100 percent crop insurance Prashant Dikkar