योजना

Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेंतर्गत शेती अवजारे व ट्रॅक्टरसाठी लाभार्थ्यांना लागली लॉटरी

Yojana | केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक (Financial) प्रोत्साहन मिळावे. शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेंतर्गत सर्व योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत शेती (Agriculture) अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेती अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान (Tractor Subsidy) दिले जाते. आता याच योजनेंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना निवड
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर सर्व योजना राबवल्या जातात. या पोर्टलवर शेतकरी शेती (Department of Agriculture) योजनांची माहिती मिळवून अर्ज करू शकतात. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर व शेती अवजारांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची (Agriculture) निवड करण्यात आली आहे.

पात्र शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही पोर्टलवर जाऊन चेक करू शकता. जर तुमची निवड झाली असेल तर तुमच्या अर्जापुढे विनर असे दाखवण्यात येईल. यानंतर तुम्हाला 7 दिवसाच्या आत कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर तुम्ही अवजारांची खरेदी (Finance) करू शकता.

वाचा: सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा सोयाबीनच्या दरात झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

किती मिळते अनुदान?
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारांसाठी 50 टक्के व 40 टक्के अनुदान (Subsidy) दिले जाते. ज्यात अनुसूचित जाती जमाती तसेच महिला शेतकरी व अल्प आणि अत्यल्प भूधारक प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना 50 टक्के व इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येते.

ऑनलाईन करा अर्ज
या योजनेच्या लाभासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ज्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शेकता. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान देण्यात येते. ट्रॅक्टर व अवजरांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

काय आहे पात्रता आणि अटी?
• एका शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येतो.
• शेतकरी अनुसूचित जाती वर्गामधील असणे आवश्यक.
• या योजनेचा फायदा केवळ एकच अवजारासाठी देण्यात येतो.
• म्हणजे राज्य शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान फक्त एकाच औजारासाठी देण्यात येते. उदाहरणार्थ (ट्रॅक्टर अवजारे / यंत्र )
• आधार कार्ड असणे आवश्यक.
• लाभार्थी कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मानण्यात येईल.
• मात्र त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
• जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने अवजारासाठी लाभ घेतला असेल परंतु त्याच अवजारासाठी किमान 10 वर्षे तरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येतो.
• एखाद्या शेतकऱ्याने या आधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
• अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक.

वाचा: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मिळणारं मोफत अन् दप्तरातील ओझही होणारं कमी

आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड
• 7/12 उतारा 8 अ दाखला
• अर्जदार अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्र.
• अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
स्वयंघोषणापत्र.
• राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
• पूर्व संमती पत्र
• पासपोर्ट आकाराचे फोटो
• जो अवजार खरेदी करायचा आहे त्या अवजाराचे
• कोटेशन.
• केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अवजार तपासणी अहवाल.

Web Title: Good news for farmers! Beneficiaries got lottery for agricultural implements and tractors under this scheme

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button