Seeds Subsidy | बातमी कामाची! शेतकऱ्यांना रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारीच्या पिकाला मिळणार अनुदान; त्वरित ‘असा’ करा अर्ज
Seeds Subsidy | News work! Subsidy to farmers for gram and sorghum crop during rabi season; Apply immediately
Seeds Subsidy रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत अनुदानित हरभरा बियाणे विक्री सुरू झाली आहे. महाबीजकडून १० वर्षांच्या आतील व १० वर्षांवरील9(Seeds Subsidy) हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करण्यात आले आहे.
१० वर्षांच्या आतील फुले विक्रम, फुले विक्रांत, एकीजी- ११०९, बीजीएम,१०२१६ वाणाचे हरभऱ्याच्या बियाणांची २० किलोची बॅग असून त्याची मूळ किंमत १ हजार ७०० रुपये प्रति बॅग आहे. त्यावर ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वजा करून ही बॅग १२०० रुपयांना मिळणार आहे.
तसेच १० वर्षांवरील विजय दिग्विजय वाणाची बॅग ही २० किलोची आहे. तिची मूळ किंमत १ हजार ५४० रुपये आहे. त्यावर ३०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वजा करुन १ हजार २४० रुपये दराने हरभरा बियाणे महाबीजचे विक्रेते व उपविक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात येणार आहेत.
वाचा : Cotton Seed Act | ब्रेकींग! शेतकऱ्यांची फसवणुकीचा कायमचाच बंधोबस्त; राज्यात कापूस बी-बियाणे कायदा होणार लागू, महत्त्वपूर्ण शासन निर्णय
अनुदानित हरभरा बियाणे खरेदीसाठी ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज केला आहे, त्यांनी कृषी सहायक अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परमीट घेऊन बियाणे खरेदी करावे. इतर शेतकऱ्यांनी महाबीज विक्रेते व उपविक्रेत्याकडे ७/१२ व आधारकार्डची झेरॉक्स प्रत देऊन अनुदानित बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
एक शेतकऱ्याला ७/१२ वरील क्षेत्रानुसार जास्तीत जास्त ५ एकरसाठी ५ बॅगपर्यंत खरेदी करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परमीट घेऊन व इतर शेतकऱ्यांनी ७/१२ व आधारकार्डची झेरॉक्स प्रत देऊन अनुदानित हरभरा बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकायांनी केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने परमिट देण्यात येणार आहे. त्यानंतर कृषी निविष्ठा विक्रेता दुकानातून बियाणे उपलब्ध होणार आहे. दरम्यान, बियाणे शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहे.
नवीनता
- यावर्षी अनुदानित हरभरा बियाणे विक्रीची सुरुवात 11 नोव्हेंबर 2023 रोजी झाली आहे.
- १० वर्षांच्या आतील फुले विक्रम, फुले विक्रांत, एकीजी- ११०९, बीजीएम,१०२१६ वाणाचे हरभऱ्याच्या बियाणांची २० किलोची बॅग १२०० रुपयांना मिळणार आहे.
- १० वर्षांवरील विजय दिग्विजय वाणाची बॅग १ हजार २४० रुपयांना मिळणार आहे.
- एक शेतकऱ्याला ७/१२ वरील क्षेत्रानुसार जास्तीत जास्त ५ एकरसाठी ५ बॅगपर्यंत खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा :
Web Title : Seeds Subsidy | News work! Subsidy to farmers for gram and sorghum crop during rabi season; Apply immediately