कृषी बातम्या

“या” कारखाण्याकडून शेतकऱ्यांना क्रेडिटवर बियाणे; या पिकांचे बियाणे वाटप करण्याचा घेतला निर्णय ..

महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे (Crops) नुकसान झाल्याने शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला. या सर्व बाबींचा विचार करून राजाराम कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना हातभार लागण्यासाठी क्रेडिटवर (On credit) बियाणांचा पुरवठा करणार असल्याची घोषणा केली गेली आहे.

वाचा –

😱 फक्त 12 रुपयांत 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण; अगदी कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो..

या जातीचे ऊस बियाणे/ ऊस रोपे क्रेडीटवर देणार –

नदीकाठच्या सभासद शेतकऱ्यांना (farmers) या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राजाराम कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. शेतातील (Farm) बाधित ऊस पिक काढून त्याच क्षेत्रात ऊसाची पुर्नलागण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांना (farmers) कमाल १ एकर मर्यादित क्षेत्राकरीता क्रेडिटवर को – ८६०३२, ९२००५, १०००१, ९०५७, ८००५, ३१०२ या जातीचे ऊस बियाणे अथवा ऊस रोपे क्रेडिटवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. शेतकरी (farmers) जास्त प्रमाणात ऊस पिकावर अवलंबून आहे. यावर्षी संपूर्ण ऊस पिक बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांनी काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बियाणे (Sugarcane seeds) किंवा ऊस रोपे (Sugarcane seedlings) देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा –

सभासदांना प्रति शेअर्स पाच किलो सवलतीच्या दरातील साखर देण्याचा निर्णय –

कारखान्यामार्फत सुरु असलेल्या वेगवेगळ्या ऊस विकास योजनांची माहिती पत्रकाव्दारे देण्याचे काम शेती (Agriculture) विभागामार्फत सुरु आहे. संचालक मंडळाने सर्वच सभासदांना प्रति शेअर्स पाच किलो सवलतीच्या दरातील साखर देण्याचा निर्णय घेतला. तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजना माहितीसह मास्क किटचे वाटप सर्व सभासदांना (members) केले जात आहे.

वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button