
राज्यामध्ये करोना मोठ्याप्रमाणात थैमान घातले असल्यामुळे अनेक ठिकाणी कडक लॉक डाउन (Lock down) व कडक निर्बंध लागू केले आहेत, याला अहमदनगर देखील अपवाद नाही. अहमदनगर (Ahmednagar) मध्ये सध्या कडक लॉकडाऊन असल्याकारणामुळे ,खरीप हंगामात पिक कर्ज (Crop loan during kharif season) घेताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही या उद्दिष्टाने, अहमदनगर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कोविड च्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ला असला तरी,शेतीची कामे सुरळीतपणे चालू आहेत परंतु अशा परिस्थितीत शेतकरी बॅंकांमध्ये पीककर्ज (Peak loan) घेण्यासाठी जाऊ शकत नाही, यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (National Informatics Center) (एनआयसी) तसेच जिल्हा अग्रणी बँक, अहमदनगर (Central Bank Of India / सेंट्रल बँक ऑफ इंडिया) यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गासाठी ऑनलाइन पीक कर्जासाठी (For online crop loans) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच आपल्याला दुसऱ्या पद्धतीने देखील म्हणजेच
ऑनलाईन पीक कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2021-22-ahmednagar-district/ या लिंकवर खरीप पीक कर्जासाठी अर्ज करावयाचा आहे.
या लिंक वर जाऊन योग्य माहिती भरल्यास पुर्वी प्रक्रिया फोन द्वारे देखील करता येणे शक्य आहे. त्याकरता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही अशी माहिती श्री. वालावलकर यांनी सांगितली.
हेही वाचा:
१)महिंद्राने शेतकर्यांसाठी बटाटे लागवड करण्याची केली मशीन तयार; पहा सविस्तर…
२)कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!