आहारामध्ये हळदीचा समावेश आहाराचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो तसेच आरोग्याच्या दृष्टीने पहिले तर हळदी मध्ये अँटिबायोटिक्स असल्याने हळद शरीरासाठी फायदेशीर ठरते. गेल्या 2 महिन्यापासून हळदीचे भाव प्रति क्विंटल 2. 5 ते 3 हजार रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. गेल्या 5 वर्षामधील हळदीचे भाव पाहता या दोन महिन्यातील भाव उच्चांक गाठत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात ठोक बाजारामध्ये हळदीचा भाव 8 हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे.
देशात हळदीचे सर्वात जास्त उत्पादन तेलंगणा राज्यात होते. परंतु 2019-20 मध्ये हळद लागवडीच्या प्रमाणात घट झालेली असल्याने तसेच राज्यात अवकाळी पावसामुळेही हळदीच्या उत्पादनात 25 % नी घट झाली आहे.
उत्पादन घटल्याने हळदीचे भाव वाढले आहेत.हळद हि अँटीबायोटीक असल्याने हळदीचा वापर अनेक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. कोरोना काळात हळदीची मागणी वाढल्यानेही हळदीचे भाव वाढण्यासाठी मदत झाली.
WEB TITLE: See how high the price of turmeric is in 5 years