महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (Mahatma Phule Agricultural University Rahuri) कृषि विद्या विभागांतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प चालू करण्यात आला आहे, या प्रकल्पांतर्गत दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील तालुकानिहाय हवामान अंदाज (Weather forecast) तसेच कृषी सल्ला दिला जातो.
हवामानाचा अंदाज (Weather forecast) व इतर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी व्हाट्सअप द्वारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे अशी माहिती डॉ सोळुंके यांनी दिली.
हवामान आधारित कृषी सल्ला आपल्या मोबाईल वर मिळवण्याकरिता शेतकऱ्यांनी केवळ 8421012185 हा नंबर सेव (Farmers can save only 8421012185 to get weather based agricultural advice on their mobile) करून यावर फक्त आपल्या तालुक्याचे नाव टाकावे त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्याच्या ग्रुप मध्ये समाविष्ट करण्यात येईल
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व विद्यापीठाद्वारे प्रसाद केला जाणारा हवामान अंदाज व कृषी सल्ला याची माहिती मिळवावी असे डॉक्टर साळुंके यांनी सांगितले. तसेच यांची एम किसान (M. Kisan) ॲप द्वारे पाच लाख लोकांना टेक्स्ट मेसेज मिळत आहेत व सात हजार लोक व्हाट्सअप ग्रुप ला जोडले गेले आहेत.
निश्चितच या एप्लीकेशन मुळे अहमदनगर येथील शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार असून, तज्ञ सल्लागारांकडून कृषी सल्ल्याची माहिती मिळणार आहे. तरी शेतकरी मित्रांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आनंद साळुंके यांनी सांगितले.
हेही वाचा :
1)केळी बागायतदारांसाठी “कृषी संशोधन परिषदेने” तयार केलंय नवीन ॲप; काय वैशिष्ट्य आहे या एप्लीकेशनचे?
2)शरद पवार ग्रामसमृद्ध योजनामध्ये लाभार्थी होण्यासाठी कुठे व कसा अर्ज कराल?