कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! प्रोत्साहन अनुदाची दुसरी यादी ‘या’ तारखेला होणारं प्रकाशित; प्रशासनाने दिली माहिती

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Farming) मिळणार आहे.

वाचा: ब्रेकिंग! पोकरा योजनेचे कोट्यवधींचे अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात; त्वरित तपासा लाभार्थी यादी

दुसरी यादी कधी होणार प्रकाशित?
प्रशासनाकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी यादी ही 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत कधीही प्रकाशित केली जाईल अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. परंतु आता प्रशासनाने ही दुसरी यादी 7 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल अशी माहिती दिली आहे. या याद्या सीएससी पोर्टलवर शेतकऱ्यांना (Agricultural Information) पाहायला मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे.

नवीन वर्षापूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 13वा हप्ता

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणारं तीन टप्प्यांत
• शेतकऱ्यांची पहिली यादी- 8.29 लाख
अनुदानची रक्कम – 4,000 कोटी
• शेतकऱ्यांची दुसरी यादी- 10 लाख
अनुदानाची रक्कम- 5,000 कोटी
• शेतकऱ्यांची तिसरी यादी- 4.85 लाख
अनुदानाची रक्कम- 1,200 कोटी

वाचा: महत्त्वपूर्ण शासन निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं सोयाबीन अनुदान, जाणून घ्या…

कशी पाहाल तुमची पात्रता?
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र आहात की नाही? हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान मिळणार की नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल. ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून देखील तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळू शकता. ज्यासाठी तुम्ही सीएससीच्या (csc) पोर्टलवर जाऊन तुमची पात्रता तसेच बँक खाते याबाबत माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल. यावर तुम्ही विचारलेली माहिती भरून तुमची पात्रता कागदपत्रे तपासू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Second List of Incentive Grants to be published on date; Information provided by the administration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button