कृषी तंत्रज्ञान

Soybean Varieties | अधिक उत्पादन वाढीसाठी व रोगराईमुक्त सोयाबीन जातींचा शोध…

Soybean Varieties | भारत एक कृषिप्रधान देश असून 90% लोक शेती करताना दिसतात. सोयाबीन हे एक मुख्य पीक आहे . ते खरीप हंगामात (Kharif Season) पेरले जाते .आपल्या राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठे लक्षणीय आहे.मध्यप्रदेश नंतर सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यातील अनेक भागात वेगवेगळ्या सोयाबीनच्या जातींचा (Agricultural Information)वापर केला जातो. सोयाबीनच्या जातींचे (Soybean varieties) उत्पादन आणि उगवण क्षमता वेगळी असल्याने शेतकरी (farmer) सोयाबीनच्या जातीची निवड करताना विचार करून करत असतो.

सोयाबीनचा विकसित जाती –

रोगराई पासून मुक्त करण्यासाठी सोयाबीनच्या नवीन जाती विकसित केल्या गेल्यात. शेतकऱ्याला रोगापासून भरपूर नुकसान होत असते व त्यामुळे उत्पन्नात भर पडत नाही. अशा स्थितीत त्याला नुकसान(Agricultural Information) भोगावे लागते . संशोधनाने विकसित केलेल्या जातींबद्दल आपण आज जाणून घेऊ.

वाचापीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार तब्बल 15 लाख; जाणून त्वरित करा अर्ज

सोयाबीनच्या तीन नवीन विकसित जाती –

1. एनआरसी 136- या संशोधन संस्थांनी विकसित केलेली ही जात लागवडीनंतर एकशे पाच दिवसात काढणीस(Agricultural Information) येते. या जातीपासून येणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर सरासरी एका हेक्‍टरमध्ये सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात दुष्काळासारख्या परिस्थितीत देखील तग धरू शकते. या जातीला मध्यवर्ती क्षेत्रासाठी मान्यता देण्यात (Agricultural Information)आली असून ही जात मुंगबीन येलो मोजॅक या रोगास प्रतिरोधक आहे.

  1. एनआसी 157- सोयाबीनची ही जात लागवडीनंतर 94 दिवसांत काढणीस तयार होते.या जातीपासून सरासरी प्रतिहेक्टर साडे सोळा ते सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सोयाबीनची ही जात अल्टरनेरिया लिफ स्पॉट, टारगेट लिफ स्पॉट यासारख्या रोगांना माफक प्रमाणात प्रतिरोधक असून या जातीची उशिरा पेरणी करता येते. जर या जातीबद्दल शास्त्रज्ञांच्या मताचा विचार केला तर 20 जुलैपर्यंत ह्या जातीची पेरणी करणे शक्य आहे.

3. एनआरसी 131- ही जात लागवडीनंतर 93 दिवसांमध्ये काढणीस तयार होते. सोयाबीनच्या नवीन जाती पासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर प्रतिहेक्टर सरासरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ही जात टारगेट लिफ स्पॉट आणि चार्कॉल रूट यासारख्या रोगांसाठी माफक प्रमाणात प्रतिरोधक असून पूर्वेकडील भागासाठी विकसित करण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button