भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!
SBI warns customers of India's largest bank
भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे “स्टेट बँक ऑफ इंडिया” (“State Bank of India”) या बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट (Alert)जाहीर केलेला आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट (Tweet) करून जागरुक राहण्याचे आवाहन देखील ग्राहकांना केले आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ैसे मिळत नाही, त्यामुळे दुसर्या किंवा अनोळखी व्यक्तीला (To a stranger) पाठवलेला क्यू आर कोड स्कॅन(.QR code scan) करू नका असे आवाहन देखील बँकेने केले आहे.
जर चुकून कोणताही अनोळखी व्यक्तीचा कोड स्कॅन केला दर तुमच्या अकाउंट मधले पैसे जाऊ शकतात व व तुमची फसवणूक होऊ शकते.कोरोना च्या काळामध्ये ऑनलाइन बँकिंग(Online banking) चा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी तितकाच ऑनलाईन फ्रोड म्हणजेच फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे.अशा प्रकारच्या फसवणुकीची (Cheating) तक्रार ग्राहकाकडून बँकेकडे येत आहे.
हे ही वाचा: १) शेतकरी असल्याचा दाखला कसा मिळवाल वाचा सविस्तर पणे
ऑनलाइन बँकिंगचा वापर करताना सावधगिरीने केली पाहिजे तसेच फसवणूक होत असेल किंवा फसवणुकीचा संशय आल्यास थेट बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा व त्यांना याबाबत माहिती कळवावी स्टेट बँकेकडून ग्राहकांना सावधगिरीने व्यवहार करण्याचा सल्ला देखील दिला आहे. क्यू आर कोड द्वारे (By QR code) कशी फसवणूक केली जाते हे समजावून सांगण्यासाठी एसबीआय एक व्हिडिओ शेअर केला आहे.फसवणूक करणारी व्यक्ती कशा प्रकारे क्यू आर कोड पाठवतात आणि पैसे उकळतात हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे त्याकरता ग्राहकांनी लक्ष ठेवले पाहिजे.
तसेच एस बी आय ने केल्यानुसार आपली खाजगी माहिती नेहमी गुप्त ठेवावी किमान दोनदा विचार करावा कोणती घटना घडल्यास https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार नोंद करातसेच एस बी आय यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकाने पॅन कार्ड ,मोबाईल नंबर ,प्रमाणपत्रे, यु पी आय पिन ,एटीएम कार्ड क्रमांक ,कोणालाही सांगू नका. असे एसबीआय कडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा: एक शेतकरी आणि एक अर्ज अनेक योजना लाभार्थी होण्यासाठी काय कराल वाचा सविस्तर पणे