उद्यापासून SBI बँकेच्या “या” वेळेत सेवा बंद राहणार; ग्राहकांना सावध राहण्याचा दिला इशारा..
SBI (State Bank of India) खाते धारकांसाठी महत्वाच्या सूचना आहेत. उद्यापासून 3 दिवस काही तासांसाठी बँकेतील सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी ग्राहकांनी यावेळेत ऑनलाईन व्यवहार (Online transactions) करताना सावध राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही वेळेसाठी तीन दिवस ही बँक सेवा (Banking services) बंद ठेवणार आहे. आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
या कारणामुळे सेवा बंद राहणार-
सिस्टम मेंटनन्समुळे 09, 10 आणि 11 ऑक्टोबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite, UPI चा समावेश आहे. बँकेला काही डिजिटल सेवा अपग्रेड (Digital service upgrade) करायच्या असल्याने ही असुविधा होणार आहे.
वाचा –
या वेळेत व्यवहार बंद –
या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. या वेळेत ग्राहक व्यवहार करू शकणार नाहीत. तरी ग्राहकांनी या वेळेत वेळ वाया घालवू नये कदाचित स्वतःचे नुकसान होऊ शकते. अशा सूचना ग्राहकांना दिल्या आहेत. तसेच एसबीआयने म्हटले आहे की, बँक आपला युपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करत असल्याने या दरम्यान ग्राहकांना युपीआय ट्रांजक्शन (UPI transaction) बंद राहतील.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा