योजना

एसबीआय बँकेची शेतकऱ्यांसाठी मोठी योजना; आता मिळणार त्वरित ट्रॅक्टर लोन..

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी स्वतःचा ट्रॅक्टर घेऊ शकणार आहे. अशावेळी पैशांची मदत पडेल तर एसीबीआय शेतकऱ्यांना “ट्रॅक्टर लोन” देत आहे. शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या योजनेच्या अंतर्गत SBI ट्रॅक्टर विमा आणि नोंदणी शुल्कासह ट्रॅक्टरच्या किमतीच्या 100% पर्यंत कर्ज प्रदान करते. या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

एसबीआय कर्ज या लोकांना देणार –

शेतकऱ्यांकडे तत्काळ ट्रॅक्टर कर्जासाठी किमान 2 एकर जमीन असायला हवी. सर्व शेतकरी या योजनेंतर्गत बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात.

महत्वाची कागदपत्रे –

1) कर्जासाठी अर्ज भरा, यामध्ये कोणत्याही डीलरकडून ट्रॅक्टरचे कोटेशनदेखील टाका.
2) ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅन, पासपोर्ट, आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एक असावे.
3) पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्समधील एक असावे.
याशिवाय लागवडीयोग्य जमिनीचा पुरावा सादर करावा लागेल.तसेच 6 पोस्ट डेटेड चेक द्यावे लागतील.

वाचा

एसबीआयचे व्याज –

1) कर्जाच्या रकमेतून टीडीआरची रक्कम वजा केल्यानंतर उर्वरित रकमेवर व्याज आकारले जाईल.
2) मार्जिन 25%: एक वर्षाचा MCLR + 3.25% p.a. अर्थात 10.25 टक्के.
3) मार्जिन 40%: एक वर्षाचा MCLR + 3.10% p.a. अर्थात 10.10 टक्के.
4) मार्जिन 50%: एक वर्ष MCLR + 3.00% p.a. म्हणजे 10 टक्के.
5) प्रारंभिक शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के प्रक्रिया शुल्क आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button