“या” पिकाला क्रॉप कव्हर करून करा पैशांची बचत ; चाळीस दिवसांपर्यंत अजिबात फवारणीची गरज पडणार नाही..
शेतकऱ्यांचा कल भाजीपाला व्यवसायाकडे दिसून येत आहे. या व्यवसायात चांगला नफा देखील मिळवत आहेत. आणखी नफा वाढवायचा असेल तर योग्य काळजी देखील घेयला हवी. भाजीपाल्यांची लागवड करत आहात तर क्रॉप कव्हर विषयी माहीत असणे गरजेचे आहे. अशाच काही भाजीपाल्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत..
वाचा –
कारली चवळी ड्रीप मल्चिंगवर लागवड –
कारले, चवळी, यांचे ड्रिप मल्चिंगवर लागवड केली तर कारले पिकाला सुरक्षेकरिता कापडाचे आच्छादन अर्थात क्रॉप कव्हर लाख मोलाचे ठरलेले आहे. क्राप कव्हरमुळे पिकाला चाळीस दिवस पर्यंत अजिबात फवारणीची गरज पडत नाही. शेतकऱ्यांनी जैविक किटकनाशकाचा सुरुवातीपासून वापर करावा. शक्यतो कमीत कमी रासायनिक किटकनाशकाचा उपयोग करा. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार प्रत्येक भाजीपाल्यावर कीडनाशकाची योग्य ती शिफारस केलेली आहे त्याच नियोजनाने कीडनाशक नियंत्रणाकरिता फवारणी करा.
वाचा
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातले चुलबंद खोरे चर्चेत आहे. भाज्यांची मल्चिंगवर लागवड केली जाते. इस्त्राइल देशासारखी नियोजित तंत्रशुद्ध शेती चुलबंद खोऱ्यात अनुभवायला येत आहे. या परिसरात बागायतीत सर्वच पिके घेतली जातात. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला कृषी विभागाचे सहकार्य प्रेरणादायी ठरत आहे. होतकरू बागायतदार धान शेतीपैकी किमान एक एकर शेतीत भाजीपाल्याची शेती करत आहे. अशी भाजीपाला शेती केली तर शेतकऱ्यांना नक्की फायद्याची ठरेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा