Astrology | पुढचे 6 महिने ‘या’ राशींसाठी धोक्याचे, शनीच्या वक्रदृष्टीपासून प्रतिकूल परिस्थितीसाठी करा…
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे. ग्रह (Planet) आणि नक्षत्रांच्या (Constellation) हालचालींचा प्रभाव हा सर्व 12 राशींवर (Amount) पडत असतो.
Astrology | ग्रहांच्या चालीमुळे काही राशींना शुभ (Auspicious) तर काही राशींना अशुभ फळ (Ominous fruit) मिळते. त्यामुळे साप्ताहिक कुंडली (Weekly Horoscope) ही ग्रहांच्या हालचालीवरून काढली जाते. शनि (Sat) हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. कारण, शनिला सूर्यपुत्र (Suryaputra) आणि कर्माचा दाता म्हणतात.
शनी देवता
शनीची काही राशींवर नेहमी वक्र दृष्टी असते. यामुळे लोक शनिदेवाला घाबरतात. मात्र, शनिदेव हे नेहमीच वाईट फळ देतात असे नाही. ते शिस्त लावण्यासाठी व्यक्तींची परीक्षा घेत असतात. त्यामुळे घाबरून न जाता शनी देवाच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी काही उपाय करावेत. ज्योतिषशास्त्रात शनी देवाला न्याय देवता असे संबोधले जाते. माणसाच्या कर्मानुसार त्याला तसे फळ देण्याचे काम शनिदेव करत असतात. शनि एखाद्याच्या जन्मराशीमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि बाराव्या स्थानात असेल तर शनिची साडेसाती म्हटली जाते. त्यामुळे काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
कोणत्या राशीवर राहणार वक्रदृष्टी?
पुढील सहा महिन्यात शनी देवाची वक्रदृष्टी ही कोणत्या राशीवर असेल ते आपण जाणून घेऊया. 12 जुलै रोजी शनी पुन्हा राशी बदलणार असून तो कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींवर शनीचा प्रभाव सुरू होणार असून काही राशींना शनीपासून सुटका मिळणार आहे.
वाचा: Astrology | बाप रे! तुम्हालाही येताहेत का ‘असे’ संकेत? तर समजा मृत्यू आलाय जवळ, जाणून घ्या…
6 महिने शनी राहणार मकर राशीत
12 जुलै 2022 ते 17 जानेवारी 2023 पर्यंत, शनी हा मकर राशीमध्ये असणार आहे. या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये शनी हा मकर राशीमध्ये राहणार आहे. त्यामुळे शनीचा मकर राशीत प्रवेश होताच मिथुन आणि तूळ राशीवर त्याचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे मिथुन आणि तूळ राशी असणाऱ्या व्यक्तींनी पुढील सहा महिने विविध गोष्टींची काळजी घेऊन देवाची उपासना करावी. तसेच, शनि पुन्हा मकर राशीत प्रवेश करत असताना मकर आणि कुंभ राशीच्या लोकांचीही शनि साडेसाती राहणार आहे, तर मीन राशीच्या व्यक्तींना शनिपासून 6 महिने मुक्ती मिळणार आहे.
काय कराल उपाय?
दरम्यान, शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना करणे, नामस्मरण करणे उपयुक्त ठरते. तसेच यामुळे शनीचा होणारा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असल्याचे सांगितले जाते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: