SatBara Utara | ब्रेकिंग न्यूज! शेतकऱ्यांनो खाते क्रमांकापासून ते व्यक्तीचे नाव कमी करण्यापर्यंत सातबारा उताऱ्यात झाले ‘हे’ 11 बदल, जाणून घ्या
SatBara Utara | राज्य सरकारने सातबारा उताऱ्यात 50 वर्षांनंतर महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट, अचूक आणि वापरण्यास सोपा झाला आहे. महसूल विभागाने हे बदल शेतजमिनीच्या नोंदींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केले आहेत. (SatBara Utara Changes)
सातबारा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे शेतजमिनीच्या हक्कांची नोंद. यामध्ये दोन मुख्य भाग आहेत: गाव नमुना-7, जो शेतजमिनीवरील हक्कदारांची माहिती देतो, आणि गाव नमुना-12, जो जमिनीवरील पिकांची नोंद करतो. राज्य सरकारने या दोन्ही भागांमध्ये सुधारणा करून नोंदी अधिक स्पष्ट केल्या आहेत. (सातबारा उतारा बदल)
सातबारा उताऱ्यात 11 बदल
सातबारा उताऱ्यात झालेल्या 11 महत्त्वाच्या बदलांमध्ये एक मोठा बदल म्हणजे गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक जोडला गेला आहे. यामुळे प्रत्येक गावाची ओळख आणि स्थान अधिक स्पष्ट होते. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शेतजमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता. लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जातात. त्याचप्रमाणे, क्षेत्र मोजण्यासाठी ‘हेक्टर’ आणि ‘आर चौरस मीटर’ यांचे मोजमाप पद्धती म्हणून वापरण्यात येतील.
नोंदीमध्ये झाला बदल
खाते क्रमांक अधिक स्पष्टपणे दाखवले जात आहेत. पूर्वी ‘इतर हक्क’ या भागात असणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दर्शवला जातो. मयत खातेदारांची नोंदी देखील बदलली आहेत; मयत व्यक्तीची नोंद आडवी रेषा मारून दर्शवली जाते. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ‘प्रलंबित फेरफार’ या रकान्याचा समावेश. हा रकाना त्या जमिनींसाठी असेल, ज्यांची फेरफार प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे. तसेच, गट क्रमांक आणि शेवटच्या व्यवहाराची माहिती एकाच ठिकाणी दिली जात आहे.
बिनशेती क्षेत्रांसाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक कायम राहणार असून, त्यात पूर्वीचे अतिरिक्त रकाने काढून टाकण्यात आले आहेत. अकृषिक जमिनींसाठी एक सूचना देखील दिली आहे, ज्यामध्ये या जमिनीवर गाव नमुना-12 लागू नाही, अशी माहिती दिली जाते. सुधारणा केल्यामुळे सातबारा उतारा अधिक माहितीपूर्ण झाला असून, महसूल विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणली आहे. डिजिटल प्रणालीमुळे हा सर्व प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाली आहे.
हेही वाचा:
• शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार! सरकारकडून ‘पंतप्रधान धन धान्य योजने’ची घोषणा; पाहा काय होणार फायदा?







