योजना
Sarkari Yojana | महाराष्ट्र सरकारची ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना ; मुख्यमंत्री वयोश्री योजना
Sarkari Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना नावाची नवीन योजना महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे. या योजनेनुसार, (Mukhyamantri Vayoshree Yojana) 65 वर्षांवरील आणि दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले ज्येष्ठ नागरिक 3 हजार रुपये आर्थिक (Financial) मदत मिळणार आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांमधील अपंगत्व आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मदत करणे हा आहे.
- योजनेचे फायदे
- 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये आर्थिक मदत
- अपंगत्व आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत
- मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन:स्वास्थ्य केंद्र आणि योगोपचार केंद्रांमार्फत प्रबोधन आणि प्रशिक्षण
- योजनेची अंमलबजावणी
- ग्रामीण भागात: जिल्हाधिकारी
- शहरी भागात: आयुक्त
- लाभार्थी निवड:
- आरोग्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण आणि स्क्रीनिंग
- पात्र लाभार्थ्यांची तपासणी
- पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा
- योजनेसाठी निधी
- 480 कोटी रुपये
वाचा | Co-operative Societies Loan | शिंदे सरकारची नवी योजना! बिगर कृषी सहकारी पतसंस्थांसाठी १ लाख रुपयांपर्यंत सहाय्य निधी योजना
- लाभार्थ्यांची संख्या
- अंदाजे 15 लाख ज्येष्ठ नागरिक
- योजनेची वैशिष्ट्ये
- ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल.
- केंद्र सरकारची राष्ट्रीय वयोश्री योजना निवडक जिल्ह्यांमध्ये राबविली जाते.
- अटल बांबू समृद्धी योजना
- या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा आणि देखभालीसाठी अनुदान देण्यात येईल.
- योजनेचे फायदे
- बांबू लागवडीला प्रोत्साहन
- शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
- अनुदान
- दोन हेक्टर क्षेत्रासाठी 1200 रोपे
- प्रति रोप 175 रुपये अनुदान (तीन वर्षात)
- बांबू रोपांची निंदनी, पाणी, संरक्षण आणि खतासाठी अनुदान
- योजनेचा उद्देश
- बांबू लागवडीत वाढ
- शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
- महाराष्ट्र सरकारच्या या दोन्ही योजनांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
Web Title | Sarkari Yojana | Maharashtra government’s new scheme for senior citizens: Mukhyamantri Vayoshree Yojana
हेही वाचा