Health Plan| पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार|
पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार|
Health Plan| सांगली, 3 जुलै 2024: राज्य सरकारने एका महत्वाच्या निर्णयात (decision) महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थींना रुग्णालयात दाखल होण्यापासून ते तपासणी, औषधे आणि शस्त्रक्रिया यासह पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. हा निर्णय आजपासून अंमलात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ (benefits) मिळणार आहे. यापूर्वी, फक्त अंत्योदय, अन्नपूर्णा आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने राज्यातील लाखो गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे. आयुष्यमान कार्डसाठी अर्ज (application) करण्यासाठी, शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आपली शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर शिधापत्रिकेशी संलग्न असण्यासाठी त्याचे ऑनलाईन लिंक करणे आवश्यक आहे.
वाचा: Orange Alert|:महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! पुढील ७२ तास तुफानी, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट|
आरोग्य योजनेची माहिती:
राज्य शासनाने 2012 मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना (Plan) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना दीड लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळत होते. तर, केंद्र सरकारने 2018 मध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेतून पाच लाखांपर्यंत उपचार मोफत केले जातात. 2019 मध्ये, राज्य शासनाने या दोन्ही योजना एकत्रित करून राज्यातील नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार सुरू केले. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 1356 विविध प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात.
जिल्ह्यातील लाभार्थी:
राज्य शासनाच्या या आरोग्य योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 40 हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात सर्वाधिक लाभ कर्करोग आणि हृदयरोगांच्या रुग्णांना मिळाला. जिल्ह्यातील 38 रुग्णालयांमध्ये शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते. या रुग्णालयांना गतवर्षी लाभार्थी रुग्णांवर केलेल्या उपचारांपोटी जवळपास 99 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.