योजना

कृषी यांत्रीकीकरण प्रकल्पाला तब्बल 150 कोटीं रुपयांच्या निधीसाठी मंजुरी; घ्या असा कृषी यंत्र योजनेचा लाभ..

Sanction of Rs 150 crore for agricultural mechanization project; Take advantage of this agricultural machinery scheme.

शेतकर्यांना कृषी यंत्र (Agricultural machinery to farmers) अवजारांना अनुदान देणारी एक महत्वाची योजना कृषी यंत्र (Agricultural machinery) योजना राबविण्यात येणार आहे. (RKVY-RAFTAR) च्या अंतर्गत कृषी यांत्रिक योजनेला २०२१ -२२ मध्ये राबविण्याकरिता १५० कोटी रुपयाच्या निधीसह मंजुरी देणारं एक महत्वपूर्ण शासन निर्णय काल दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आला आहे. यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने शेती करणे हि शेतकर्यांची गरज बनली आहे.

वाचा: उच्च न्यायालय चा निर्णय: विवाहित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा म्हणता येणार नाही; वाचा सविस्तर निर्णय..

या यंत्र अवजाराने शेती (Farming with machine tools) करत असताना यंत्र अवजारांसाठी शेतकर्यांना अनुदान दिले जाते. कृषी यांत्रिक योजना (Agricultural Mechanical Scheme) २०२१ मध्ये १५० कोटी रुपये निधीची तरतूद करून हि योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय काल दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आला आहे. सविस्तर शासन निर्णय पाहूया..

शासन निर्णय –

1) २०२१-२२ या वर्षात RKVY-RAFTAR अंतर्गत रु.१५० कोटी रुपये निधीचा कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

वाचा : बंपर ऑफर, प्लास्टिक मल्चिंग योजनेचा लाभ घ्या व मिळवा 16 ते 18 हजारापर्यंत अनुदान; पहा कसे..

२) प्रकल्पाची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात यावी. RKVY-RAFTAR अंतर्गत मंजूर प्रकल्पामधून केवळ कृषी यंत्र व औजारांच्या खरेदी करिता अनुदान देण्यात यावे. या निधीतून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान अनुदेय असणार नाही.

३) प्रकल्पाची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टल वर करण्यात येणार.

४) लाभार्थ्यांकडून अर्ज महाडीबीटी पोर्टलवर स्वीकारून ऑनलाईन लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार.

वाचा : मोठी बातमी: महिंद्राचा नवीन “रोटावेटर” लॉन्च, आता शेतीची मशागत करता येणार अधिक सोप्प्या पद्धतीत..

५) लाभार्थी निवडीची प्रत्यक्ष प्रकिया RKVY-RAFTAR अंतर्गत निधी उपलब्ढे नंतर उपलब्ध निधीच्या मर्यादित करणार.

६) प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या यंत्र/अवजारांचे Geo tagging करा.

७) अनुदानाची रक्कम महाडीबीटी पोर्टलवरून डीबीटी द्वारे PFMS बँक खात्यातून अदा करण्यात येत असल्याची खात्री आयुक्त यांनी करावी.

८) लाभार्थकाचा आधार क्रमांक अभिलेखामध्ये नमूद करावा.

९) लाभार्थकाचे स्थान नमूद करावे.

वाचा : मशिन एक काम अनेक: मल्टी हार्वेस्टर सहित शेतीतील दगड बाहेर काढण्याची मशीन; पहा विडिओ व वैशिष्ट्ये..

१०) RKVY-RAFTAR मधून कृषी यांत्रीकीकरण प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीमधून क्षेत्रीय स्तरावर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती आयुक्त यांनी विहित करून सर्व क्षेत्रीय अधिकार्यांनी कळवली पाहिजे.

११) शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०९०८१७५९५७३७०१ हा आहे.

अशा प्रकारे शासन निर्णय १५० कोटी रुपये निधीच्या प्रकल्पासाठी राबवण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button