Sugar control| मसुदा साखर नियंत्रण आदेश २०२४: साखर उद्योगात मोठे बदल अपेक्षित
Sugar control| कोल्हापूर: केंद्र सरकारने साखर उद्योगात मोठे बदल करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. ‘मसुदा साखर (नियंत्रण) आदेश २०२४’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मसुद्यात साखरेचे उत्पादन, विक्री, पॅकेजिंग आणि दर यासंबंधीच्या अनेक तरतुदींमध्ये (In provisions) बदल सुचवण्यात आले आहेत.
उद्योगाकडून हरकती: या मसुद्यावर साखर उद्योगांकडून २३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे यांनी याबाबत केंद्र शासनाकडे एकूणच साखर उद्येागाचे दृष्टीने ज्या कांही सूचना असतील त्या सांघिकदृष्ट्या विचार मंथन करून कळविणे योग्य हेही नमूद केले आहे.
साखर उद्योगाला दिलासा: साखर उत्पादनातील अलीकडील तांत्रिक प्रगतीचा विचार करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला या बदलांमुळे दिलासा (relief) मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः, खांडसरी उद्योगासाठी २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या खांडसरीसाठी नवे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत.
वाचा: Success agriculture| दुष्काळात फुलली फलटणच्या शेतकऱ्याची यशगाथा
महत्त्वाचे बदल:
- उपपदार्थात बदल: पूर्वी उपपदार्थांत फक्त बगॅस आणि मोलॅसिस यांचा समावेश होता. आता नव्या मसुद्यात सहवीज प्रकल्प, इथेनॉल उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे.
- साखरेचा हमीभाव: साखरेचा हमीभाव त्यावर्षीची एफआरपी, सरासरी उत्पादन खर्च व उपपदार्थांपासून मिळणारे सरासरी उत्पन्न याचा विचार करून ठरणार.
- साखरेच्या पॅकिंग: साखरेच्या पॅकिंगसाठी सध्या एकूण वापराच्या दहा टक्के ज्युट बॅगेचा वापर होतो, त्याच्यात वाढ करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे.
- साखरेची वाहतूक: साखरेची वाहतूक किंवा विक्री करण्यास परवान्याशिवाय (Without a license) मनाई.