Water| सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं खरंच फायदेशीर आहे का? शास्त्रीय माहिती आणि डॉक्टरांचा सल्ला!
Water| : आजकाल सोशल मीडियावर अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. पचन (Digestion) सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे, त्वचेसाठी चांगले आणि वजन कमी करणे अस अनेक फायदे सांगितले जातात. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे ते जाणून घेऊया आणि डॉक्टरांचा काय सल्ला आहे ते पाहूया.
गरम पाणी आणि चरबी कमी होणे:
तज्ज्ञांच्या मते, गरम पाणी थेट चरबी कमी करत नाही. पण ते शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत (help) करते. चहा-कॉफी सारख्या कॅलरीयुक्त पेयांपेक्षा गरम पाणी निवडल्याने तुम्ही कमी कॅलरीज ग्रहण करता आणि वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यास मदत होते.
वाचा:Government Job| सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! कामावरून टाकण्याची शक्यता, वेळोवेळी कामगिरीची होणार चाचणी
डॉक्टरांचा सल्ला:
गुरुग्रामच्या मारेंगो एशिया हॉस्पिटलच्या डॉ. वंशिका भारद्वाज यांच्या मते, गरम पाणी प्यायल्याने चरबीचे रेणू अधिक कार्यक्षमतेने नष्ट होण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, गरम पाणी प्यायताना ते तुमच्या शरीरासाठी योग्य तापमानाचे असणे आवश्यक आहे. जास्त गरम पाणी तोंडाला त्रास (trouble) देऊ शकते, त्यामुळे कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
गरम पाण्याचे फायदे:
- पचनक्रिया सुधारणे
- कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर
- बद्धकोष्ठता दूर करते
- रक्तदाब नियंत्रित करते
- त्वचेची चमक वाढवते
- शरीरातील विषारी पदार्थ काढन टाकते
- मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी करते
किती पाणी प्यावे:
डॉ. भारद्वाज यांच्या मते, दिवसभरात किमान 5 ग्लास गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार:
- दररोज 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
- यामुळे शरीर हायड्रेटेड आणि संतलित राहते.