ऑगस्ट महिन्यापासून आर्थिक व्यवहारासंबंधी नियम बदलणार; याचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होणार?
Rules for financial transactions will change from August; What effect will this have on the general public?
एक ऑगस्ट पासून आर्थिक व्यवहारासंबंधी यांनी नियम बदलले जाणार आहे, यामध्ये बँक सर्विस पासून नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांतही बदल झाले आहेत. चला ऑगस्ट महिन्यापासून कोणते नियम बदलणार आहे या गोष्टींचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे पाहू,
इंटरचेंज शुल्कमध्ये वाढ (Increase in interchange charges)
रिझर्व बँक ऑफ इंडियाने इंटरचेंज शुल्क वाढले असून परिणामी आर्थिक व्यवहार करताना जादा शुल्क मोजावे लागणार आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) इंटरचेंज शुल्क पंधरा रुपयांवरून 17 रुपयांवर नेले आहेत,बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहेत. बँक ग्राहकाला महिन्यातून पाच वेळा एटीएम मधून मोफत रक्कम काढता येणार आहे, त्यानंतर मात्र चार्जेस (Charges) मोजावे लागतील.
वाचा : HDFC Small Cap Fund : ‘या’ योजनेत पैसे होतात दुप्पट ; पाचशे रुपयांची अशी करा स्मार्ट गुंतवणूक..
सुट्टीच्या दिवशीही पगार बँकेत जमा होणार (Salary will also be deposited in the bank on holidays)
रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांत बदल केले आहेत. या बदललेल्या नियमानुसार, पेन्शन, वेतन, ई एम आय यासारख्या गोष्टी सुट्टीच्या दिवशी ही कार्यरत राहणार. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग (National Automated Clearing) ही संस्था क्रेडिट कार्ड, डिव्हीडंट, व्याज, वेतन यासारखे व्यवहार पार पडते.
वाचा : पाच वर्षाखालील लहान मुलांचे बनवा अशा प्रकारे आधार कार्ड जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया…
ICICI बँक ग्राहकांना भरावे लागणार मोठे चार्जेस (Icici Bank customers will have to pay huge charges)
Icici बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यातून चार वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत, त्यानंतर प्रत्येक व्यवहाराला दीडशे रुपये चार्जेस लागणार आहेत. (There will be charges of Rs 150) त्याचप्रमाणे खात्यावरील ट्रांजेक्शन लिमिट एक लाख रुपये असणार आहे. एक लाखापेक्षा अधिक रक्कम काढायचे असल्यास अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून बँक ग्राहकांना मोठा भुर्दंड भरावा लागणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :
जाणून घ्या, कसे कराल सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे किड व्यवस्थापन…
आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास…