खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये वाढ! का इतक्या खाद्य तेलाच्या किमती वाढतायत..
Rising edible oil prices !! Read the detailed news on why edible oil prices are rising so much.
कोरोनामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत पडली आहे त्यामुळे खाद्य तेलाच्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच तेलबिया मध्ये मागणीच्या मानाने पुरवठा देखील कमी पडत आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे असे ग्राहक व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे म्हणणे आहे. तसेच खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात येण्यासाठी सरकार प्रयत्न देखील करत आहेत.
सध्या किरकोळ बाजारामध्ये शेंगदाणा तेलाच्या किमती 60 रुपयांने वाढले आहे. सोयाबीन तेलामध्ये 40 रुपयांची वाढ झाली आहे तसेच मोहरी तेलामध्ये 37 रुपयांची वाढ झाली आहे सूर्यफूल तेलाची किंमत देखील 35 रुपयांनी वाढलेली आहे जवळपास तेलांच्या किमती दुप्पट झाल्याचे जाणवते.देशामध्ये जवळपास 25 दशलक्ष टन तेलाची गरज असते त्यामुळे तेलाची आयात करावी लागते.
खाद्य तेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत त्याकरता खाद्यतेल पामतेल मिशन राबवण्यात येत आहे. दहा राज्यांमध्ये मोहरी तेलाचे वाढवण्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घेतला जाणार आहेत.यातूनच तेलाच्या किमती आटोक्यात येतील असे गोयल यांना वाटते.
स्वस्त दरामध्ये खाद्यतेल उपलब्ध करून देणे शेतकरी व ग्राहकहित विचारात घेऊन समतोल राखण्याची गरज आहे व हेच केंद्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाढलेल्या तेलाच्या किमतीचा दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम चालू आहे त्यातीलच पहिला टप्पा म्हणजे शेती निगडित आयात रचना करण्यावर केंद्र सरकार भर देत आहे.