Arthritis| स्त्रियांमध्ये वाढत्या प्रमाणात होत आहे संधिवाताचा त्रास|
Arthritis| छत्रपती संभाजीनगर: वयोमानानुसार वाढते वजन, बैठी जीवनशैली, दुखणे अंगावर काढण्याची सवय, व्यायाम आणि सकस आहाराकडे दुर्लक्ष यामुळे महिलांमध्ये संधिवात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. संधिवाताच्या शंभर रुग्णांमध्ये ६० महिला रुग्ण असल्याचे निष्कर्ष (conclusion) समोर आले आहेत.
संधिवात म्हणजे काय?
संधिवात म्हणजे सांधा किंवा त्याच्या आजूबाजूला दुखणे. दोन हाडांमधील हालचालीत अडथळा आल्यास सांधेदुखी निर्माण होते. जैविक घटक, गुणसूत्रांमधील बदलांमुळेही वातरोगाची समस्या (problem) निर्माण होते. यामध्ये अनुवांशिकता हे एक प्रमुख कारण आहे.
महिलांमध्ये संधिवात का जास्त?
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या हाडांची झीज अधिक असत. यामुळे संधिवाताचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळते. वयोमानानुसार वजन वाढते. त्याचवेळी घरगुती कामाचा वाढता व्याप, जबाबदारी यामुळे व्यायाम, सकस आहाराकडे त्यांचे दुर्लक्ष होते. या कारणाने प्रामुख्याने गुडघे दुखणे सुरू होते.
वाचा: Metarrhazium| पुण्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेले जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हाझियम|
थंड हवामानाचाही संधिवातावर परिणाम
थंड पाण्यामुळेही हे प्रकार वाढतात. पावसाळ्यात थंड वातावरण (Cold weather) असल्याने स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे वातविकार वाढतात. या पार्श्वभूमीवर रुग्णांनी काळजी घेण्याची गरज आहे.
संधिवाताचे प्रकार आणि लक्षणे
- ऑस्टियोआर्थरायटिस: हा सर्वत सामान्य प्रकार आहे. यात सांध्यांची हळूहळू झीज हते. लक्षणे: सांधेदुखी, कडकपणा आणि लवचिकता कमी होणे.
- संधिवात (आरए): हा एक स्वयंप्रतिकार रोग (Autoimmune disease) आहे. यात रोगप्रतिकारक प्रणाली चुकन सांध्यांच्या अस्तरावर हल्ला करते. लक्षणे: सांधेदुखी, सूज, जडपणा आणि थकवा. हे सहसा सांध्यांना सममितीने प्रभावित करत.
- सोरियाटिक संधिवात: सोरायसिस, त्वचेची स्थिती असलल्या लोकांमध्ये उद्भवतो. लक्षणे: सांधेदुखी, सूज आणि कडकपणा; तसेच लाल, खवलेयुक्त त्वचेचे ठिपके.
- गाउट: सांध्यांमध्ये यरेट क्रिस्टल्स जमा झाल्यामळे अचानक आणि तीव्र वेदना होतात. लक्षणे: तीव्र सांधेदुखी, लालसरपणा आणि सूज, अनेकदा पायावर परिणाम होतो.
संधिवातापासून बचाव कसा?
- नियमित व्यायाम (regular exercise)
- सकस आणि संतुलित आहार
- थंड पाण्याचा संपर्क टाळणे
- थंड जमिनीचा स्पर्श टाळणे
- तासनतास मांडी घालून बसण टाळणे
- हरभरा डाळ, वाटाणे, बटाटे हे वातूळ खाद्यपदार्थ वर्ज्य करणे
- अतिगार पाणी टाळणे
- संतुलित आहार
- ठराविक वयानंतर कॅल्शिअम वाढसाठी औषधोपचार