Rent Farm Land | शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने कशी घ्यावी?
Rent Farm Land | How to rent farm land from agriculture corporation?
Rent Farm Land | आज आपण पाहणार आहोत की शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने कशी घ्यावी?
तर शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. अनेकांना शेतजमीन नसते, पण शेतीची आवड असते. त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या शेती महामंडळाकडून शेतजमीन भाडे तत्त्वावर देण्यात येते.
शेती महामंडळाकडून सध्या 41 हजार एकर शेतजमीन भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी साधारणतः: २३ हजार एकर शेतजमीन 10 वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा 10 वर्षांचा करार संपला आहे, अशी शेतजमीन पुन्हा महामंडळाकडून ताब्यात घेतली जाते आणि पुन्हा निविदा काढून जे शेतकरी जास्त भाडे देतील त्यांना भाडे करारावर दिली जाते.
जमीन भाड्याने घेण्यासाठी, तुम्हाला सरकारच्या tenders.gov.in या website वर जाऊन महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागांतर्गत शेती भाड्याने देण्याच्या निविदा पाहाव्यात. निविदा निघाल्यानंतर तुम्हाला शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे. पाणी व्यवस्था, माती, रस्त्याची सोय, लाइटची सोय अशा गोष्टी तपासून निविदा भरणे आवश्यक आहे. निविदा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधी अधिक माहितीसाठी शेती महामंडळाशी संपर्क करावा लागतो.
निविदेमध्ये शेतजमिनीचा पत्ता, गट नंबर, नकाशा, पाण्याची सोय, रोड, जमिनीचा पोत, आसपास कोणती पिके घेतली जातात, अशा गोष्टींचा सामावेश असतो. त्याचबरोबर नकाशा आणि सातबारा सोबत जोडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा अंदाज येतो.
वाचा : Animal Distribution Scheme | जिल्ह्यातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! शेळीगट व दुधाळ जनावर वाटप योजनेची मुदत वाढली!
शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, बिगर शेतकरी, शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्ज करू शकतात. शेती महामंडळाचे नियम व अटीही शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्जदारासंबंधी महामंडळाचे कोणतेही नियम नाहीत. पण, जमीन भाड्याने घेतल्यानंतर ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत महामंडळाला परत करावी लागते.
भाड्याने शेतजमीन घेतल्यावर, तुम्हाला शेतात लागवड होणाऱ्या पिकासंदर्भातील माहिती महामंडळाला देणे बंधनकारक असते. आणि दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारे पिके घेण्यास बंदी असते. संबंधित जमिनीवर आपल्याला घर, बंगला, शेड किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम करता येत नाही. या जमिनीवर फक्त पिकांची लागवड करता येते. कोणताही व्यवसाय, प्रक्रिया उद्योग करण्यास मनाई असते. संबंधित क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारी असतात. शेतीच्या सुरक्षेसाठी सरकारचे सुरक्षा रक्षक ही काम करतात त्यामुळे अतिक्रमण होत नाही.
जमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततळे, बोअरवेल, विहीर खोदू शकतात. शेती पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळावे हा त्यामागील हेतू असतो.
तर, शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी ही प्रक्रिया आहे. तुम्हीही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे शेतजमीन नसेल, तर या पद्धतीने तुम्ही शेतजमीन भाड्याने घेऊ शकता.
Web Title | Rent Farm Land | How to rent farm land from agriculture corporation?
हेही वाचा