दररोज करावी देवाची पूजा उपासना –
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवाची पूजा अर्चना दररोज केली जाते . असे म्हणले जाते ज्या घरी दररोज पूजा उपासना होते त्या घरात सुख शांती लाभते. भक्तीच्या वातावरणाने घरातलं वातावरण एकदम निर्मळ आणि चैतन्य निर्माण होते. चांगल्या मनाने दररोज पूजा केल्याने घरातील दारिद्र्य, रोग– पिडांचे हरण होते. घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात. यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तीभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी(Lifestyle ) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊ.
वाचा: घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…
महत्त्वाच्या 11 गोष्टी –
1) देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे.
2) घरात देवपूजा करतांना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे (Lifestyle )आवश्यक आहे. भग्न मूर्तिची पूजा कधीही करू नये.
3) घरातील देवघराला कळस असू नये.
4) देवांचे आसन, आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे.
5) शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये.
6) देवपूजेसाठी शिळे जल (पाणी) व शिळी फुले व्यर्ज होत, मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक, शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी.
वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…
7) तर्जनीने (अंगठ्याजवळच्या बोटाने) देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्यावरुन दुसरा दिवा प्रज्वलित करु नये.
8) देवघरात देवांच्या तसबीरी (फोटो) लावताना, त्या एकमेकांसमोर लावू(Lifestyle ) नये.
9) देवांची आरती करतांना, निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा.
10) देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून, नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर(Lifestyle ) तो लगेच खाऊ नये.
11) देवाला प्रदक्षिणा, नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे, असे गोल फिरावे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: