कृषी सल्ला

शेतकऱ्यांना दिलासा; प्रधानमंत्री घरकुल ग्रामीण साठी निधी वितरीत, मिळणार एवढ्या रकमेचा लाभ; पहा सविस्तर माहिती..

-प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. या बाबद एक महत्वपूर्ण शासन निणर्य २० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आला आहे. याविषयी शासन निर्णय सविस्तर पाहुया..

वाचा –

शासन निर्णय –

1) आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-५ मधील मुख्य लेखाशीर्ष, २५०५- ग्रामीण रोजगार या मुख्य लेखाशिर्षाखाली केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनुसूचित जमाती घटकाकरिता सन २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पीत तरतुदीमधून केंद्र व राज्य समरूप हिश्याकरिता खालीलप्रमाणे रु. ४१९२.२२५ लाख इतका निधी खालीलप्रमाणे निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्त प्रमाणे रु. ४१४९.२२५ लाख इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून अप्पर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे.

2) सदर तरतूद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२४.०६.२०२१ च्या शासन निर्णयातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहील.

3) नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी अधिवासी उपयोजना क्षेत्रात, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रात केलेला सर्व स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. त्या अनुषंगाने झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशीर्षनिहाय/उपलेखाशीर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्टाबाबत माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र इ. माहिती आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवावी.

4) आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबधित विभागाची राहील.

5) सदर शासन वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.७२०/सचिव दि.३०.०८.२०२१ अन्वये दिलेल्या सह्मतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२११०१३११४६३०३९२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

हे ही वा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button