शासन निर्णय

शेतकऱ्यांना दिलासा; इ-पीक पाहणी नोंदीबाबत मोठा निर्णय, “या” तारखेपर्यंत केली मुदतवाढ

खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत महितीभरण्यासाठी मुदतवाढ केली आहे. ही माहिती ऑनलाईन मोबाईल अँपद्वारे भरली जाणार आहे. सन 2021-2022 मधील खरीप हंगामातील पिकांच्या नोंदीसाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक एन.के. सुधांशु यांनी सूचना दिली आहे.

हे ही वाचा –

ई-पीक पाहणीची माहिती भ्रमणध्वनीवरील अँपद्वारे गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम संपूर्ण राज्यात १५ ऑगस्ट पासून सुरु केला आहे. या अँपद्वारे आतापर्यंत सुमारे ७० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपद्वारे नोंदणी केली आहे.

वाचा –

खरीप हंगामासाठी सदर अँपद्वारे माहिती भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु दरम्यानच्या काळात राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक खातेदारांची नोंदणी करणे अद्यापही प्रलंबित आहे. ई-पीक पाहणी राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अँपद्वारे माहिती भरण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या सुविधेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री.सुधांशु यांनी केले आहे.

हे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button