हवामान

मुसळधार पावसामध्ये सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले “हे” आदेश, वाचा सविस्तर..

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे आर्थिक नुकसान (Financial loss) झाले आहे. चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडला आहे. अन्य जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस होत आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

वाचा

“या” ठिकाणी सर्वात जास्त पिकांचे नुकसान –

राज्यात (state) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, औरंगाबाद, लातूर, हिंगोली अशा सर्वच जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, ऊस आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारच्या (state government) काही मंत्र्यांनी नुकसान पाहणी केली आहे.

वाचा –

तसेच मराठवाड्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकरी यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने सर्वतोपरी मदत मिळायलाच हवी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नैसर्गिक संकटाच्या काळात आपत्ती प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेकडे आधिक लक्ष द्यायला हवा तसेच या काळात सर्व यंत्रणांमध्ये समन्वय असावा, असेही त्यांनी सांगितले. महसूल आणि कृषी विभागाने (Department of Revenue and Agriculture) नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button