Compensation | 50 हजाराच्या प्रोत्साहन अनुदानाच्या ‘या’ जाचक अटी रद्द..
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

Compensation | ब्रेकिंग न्यूज: लाखो शेतकऱ्यांना दिलासा! 50 हजाराच्या प्रोत्साहन अनुदानाच्या ‘या’ जाचक अटी रद्द..

Compensation | सरकार महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana Maharashtra 2022) योजना शेतकऱ्यांसाठी राबवते . या योजने अंतर्गत नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळतो.याच योजनेच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून या योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो वंचित शेतकरी योजनेच्या लाभास पात्र ठरणार आहेत.

योजनेतून जाचक अटी रद्द-

शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळाच्या वतीने २२ जून २०२२ च्या नियमाप्रमाणे निकष जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये २०१७ ते २०१९- २० या कालावधीमध्ये कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याची पीक परिस्थिती पाहता या योजनेत मोजकेच शेतकरी पात्र ठरत असल्याचे चित्र होते. ही बाब बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना कळताच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मूळ निर्णय रद्द केल्याची माहिती आ. गायकवाड यांनी आज, २९ ऑक्टोबरला संध्याकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

वाचा: Land Purchase | गुंठेवारी जमिनी खरेदीसाठी स्थगिती; पहा सविस्तर बातमी…

याचा निर्णय काय –

२०१७ ते २०१९-२० या तिन्ही आर्थिक वर्षात नियमित कर्ज परतफेडीची अट रद्द करून कोणत्याही दोन वर्षात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आ. गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे. या सुधारित आदेशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button