कृषी बातम्या

नियमित कर्जफेड शेतकऱ्यांची चांदी! काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब पहा…

राज्यसरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. निवडणुकीत शिवसेनेने कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं. राष्ट्रवादीने देखील कर्जमाफीचं वचन दिलं होतं. त्यानुसार महाविकास आघाडीने कर्जमाफी केली. मात्र यातून नियमित कर्जफेड करणारे शेतकरी वंचित राहिले होते. त्यांच्यासाठी मदतीची घोषणा झाली होती. आज सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुषखबर दिली आहे.

शेतकरी कर्जमाफी केल्यानंतर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते.

दरम्यान उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत मदत देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. या मदतीची घोषणा आधीच झाली होती. आता पुढील काही दिवसांत याची अंमलबजावणी होणार आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल, असे अजित पवार म्हणाले. तसेच अंतरिम पीककर्जही शून्यटक्के व्याजदराने मिळणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.

Web Title: Regular loan repayment of farmers’ silver! See what Deputy Chief Minister Ajit Pawar said:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button