Cowin portal वरील नोंदणी होणार अधिक वेगवान, कोरोना लसीकरण प्रक्रिया झाली अजूनच सोपी…
Registration on Covin portal will be faster, corona vaccination process has become even easier
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाची लसीकरण प्रक्रिया अधिक वेगवान करण्याकरिता, कोरोना ची लस विविध भागांमध्ये पोचवण्याचे काम चालले आहे, दररोज अनेक नागरिक लसीकरण करून घेत आहेत.
कोरोनाच्या लसीकरनासाठी वापरात येणारे covin पोर्टल अधिक वेगवान होण्याकरिता पूर्वी जो पोर्टलवरील नोंदणीसाठी Captcha वापरला जात होता. पण, आता मात्र Captcha ची गरज नसल्यामुळे लसीकरण प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे.
अशाप्रकारे cowin पोर्टल वर तुम्ही नोंदणी करू शकता..
लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम CoWIN अँप किंवा संकेतस्थळावर भेट द्या.
त्यानंतर तिथे गेल्यानंतर Register/Sign in येथे क्लिक करा.
पुढे मोबाईल नंबर देऊन Get OTP वर क्लिक करा.
यानंतर Register for Vaccination हा पर्याय तुमच्यासमोर येईल.
इथं तुम्ही ओळखपत्र माहिती, नाव, लिंग, जन्मतारीख अशी माहिती भरणं अपेक्षित असतं.
सर्व माहिती भरल्यानंतर Register वर क्लिक करा.
रजिस्टर केल्यानंतर Appointment schedule हा पर्याय तुम्हाला दिसेल.
यानंतर Schedule या पर्यायावर क्लिक करा.
पुढे सर्च बारमध्ये पिनकोड एंटर करा, किंवा जिल्ह्याच्या सहाय्यानं तुम्ही लसीकरण केंद्र शोधा.
ज्या लसीकरण केंद्रावर लसीसाठीच्या जागा उपलब्ध आहेत त्या दिसताच तुम्हाला हवी ती वेळ निवडून Confirm वर क्लिक करा.
हेही वाचा :
1)केळीच्या सालीपासून तयार केली शू-पॉलिश; जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या शू-पॉलिशची वैशिष्ट्ये…