ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Registration On CBuD System | महत्वाची बातमी: खाजगी खोदकामासाठी CBuD नोंदणी आता बंधनकारक, नाही केल्यास दंड!

Registration On CBuD System | Important News: CBuD Registration Now Compulsory for Private Digging, Failure to Do Penalty!

Registration On CBuD System | महाराष्ट्र राज्यात खाजगी जमिनीवरही खोदकाम करण्यापूर्वी CBuD प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी ही नोंदणी केवळ शासकीय जमिनींसाठी आवश्यक होती. आता ही नोंदणी न केल्यास खोदकाम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

राज्यात पायाभूत सुविधांची उभारणी करताना मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. या उत्खननामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या इतर पायाभूत सुविधांना हानी पोहोचते. (Registration On CBuD System) यामुळे मालमत्ता आणि सुविधांचे नुकसान होते तसेच सेवांचा पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होते.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी दूरसंचार विभागाने CBuD प्रणालीची निर्मिती केली आहे. या प्रणालीद्वारे उत्खनन संस्था आणि पायाभूत सुविधा मालमत्ता मालक विभाग यांच्यात समन्वय घडवून आणण्यात येणार आहे. यामुळे उत्खनन करताना इतर पायाभूत सुविधांना हानी पोहोचण्याची शक्यता कमी होईल.

वाचा : Loan Scheme | ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा; अण्णासाहेब पाटील महामंडळाची नवीन योजना, जाणून घ्या कसं कराल अर्ज ?

खोदकाम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांनी खोदकाम करण्याच्या कार्यवाहीसाठी CBuD प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रणालीची नोंदणी अॅन्ड्रॉईड आणि आयओएस मोबाईलवर उपलब्ध असलेल्या Play Store आणि App Store मधून केली जाऊ शकते.

नोंदणी न केल्यास खोदकाम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दंडाची रक्कम ५ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

या नवीन नियमामुळे राज्यातील पायाभूत सुविधांचे संरक्षण होण्यास मदत होईल आणि नागरिकांना होणारी गैरसोय कमी होईल.

Web Title : Registration On CBuD System | Important News: CBuD Registration Now Compulsory for Private Digging, Failure to Do Penalty!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button