कृषी बातम्या

या तारखेपासून सोयाबीन विक्रीची नोंदणी सुरू; 15 केंद्रात हमीभावाने खरेदी, घ्या या योजनेचा लाभ..

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रांवर केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडतर्फे मूग प्रतिक्विंटल ७२७५ रुपये, उडीद प्रतिक्विंटल ६३०० रुपये तर सोयाबीन प्रतिक्विंटल ३९५० रुपये खरेदीसाठी शुक्रवार ता.१५ पासून नोंदणी सुरु करण्यात येणार आहे, ही माहिती राज्य सहकारी पणन महासंघाचे जिल्हा विपणन अधिकारी यांनी दिली. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचाशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील पीएम किसान हप्ता “या” तारखेला मिळणार..

ही खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत-

पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर,बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात ठिकाणी, तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत व गंगाखेड या केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरु होणार आहे. या केंद्रांच्या ठिकाणी ऑनलाइन पध्दतीने शेतकरी नोंदणी सुरु करण्यासाठी संबंधित संस्थांना सूचना दिल्या आहेत.

नोंदणीसाठी कागदपत्रे –

तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाइन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा, जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शेवाळे यांनी केले.

वाचामोठी बातमी; राज्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना 122 कोटींचा निधी मंजूर, 4 दिवसात मदतीचे वाटप करणार..

तालुका- खरेदी केंद्राचे ठिकाण- केंद्र चालक- संपर्क क्रमांक
परभणी.

तालुका खरेदी विक्री संघ, नवा मोंढा, परभणी.माणिक निलवर्ण. ९९६००९३७९६

जिंतूर.तालुका जिनिंग प्रेसिंग स. संस्था, जिंतूर.दिलीप जाधव.८३२९१६९३२५

जिंतूर. तुळजाभवानी कृ. वि.से. संस्था, बोरी..संतोष गलांडे.९३७४४१०३५

सेलू. तुळजाभवानी कृषी वि.से.संस्था, मार्केट यार्ड, सेलू .विठ्ठल शिंदे.९८६०२९८६८५४

पाथरी.स्वस्तिक सु. बे. संस्था,मार्केट यार्ड,पाथरी.अनंत गोलाईत.९९६०५७००४२

सोनपेठ.स्वप्नभूमी सु. बे. से. स.संस्था,कृऊबा,सोनपेठ.श्रीनिवास राठोड.९०९६६९९६९७

पूर्णा.तालुका खरेदी विक्री संघ, पूर्णा.संदीप घाटोळ.९३५५९३३४१३

हिंगोली.प्रगती स्वयं.से.सह. संस्था, हिंगोली..समीर भिसे .९४२२९२२२२२

कळमनुरी.कयाधु शेतकरी उत्पादक कं.तोंडापूर, वारंगा फाटा.महेंद्र माने.९७३६४४९३८३

वसमत.तालुका खरेदी
विक्री संघ, वसमत.सागर इंगोले.८३९०९९५२९४

औंढानागनाथ.तालुका खरेदी विक्री संघ,जवळा बाजार.कृष्णा हरणे .९१७५५८६७५८

सेनगांव.संत भगवानबाबा स्वयं. सेवा संस्था, सेनगाव.संदीप काकडे.७७५८०४००५०

सेनगाव. विजयालक्ष्मी बेरोज. सह. संस्था, साखरा.उमाशंकर माळोदे .९६५७२६०७४३

मानवत.तालुका खरेदी विक्री संघ,कृऊबा,मानवत.माणिक भिसे.९८६०६५४१५९

गंगाखेड.तालुका खरेदी विक्रीसंघ,एमआयडीसी,गंगाखेड.परमेश्वर भोसले.९७६७५८८१०१

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button