नादचखुळा! लाल केळीच्या लागवडीतून इंजिनियर तरुण घेतोय तब्बल दीड कोटींचं उत्पन्न, जाणून घ्या कसं करतोय व्यवस्थापन? - मी E-शेतकरी
कृषी तंत्रज्ञानयशोगाथा
ट्रेंडिंग

नादचखुळा! लाल केळीच्या लागवडीतून इंजिनियर तरुण घेतोय तब्बल दीड कोटींचं उत्पन्न, जाणून घ्या कसं करतोय व्यवस्थापन?

Success Story | पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने केळीला देशात आणि जगात मागणी वाढली असून, त्यामुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी केळी उत्पादन (Banana Cultivation) घेत आहेत. देशातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांसाठी (Agriculture) हे महत्त्वाचे पीक आहे. केळीची लागवड वर्षभर चालते, गेल्या काही वर्षांपासून केळीच्या झाडांवर विविध प्रकारचे रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे पीक आणि उत्पादनावर (Financial) परिणाम होत आहे. केळी लागवडीचे क्षेत्र वाढण्याबरोबरच त्यात अनेक नवी आव्हानेही उभी राहिली असून, त्याचा थेट परिणाम उत्पादनावर (Department of Agriculture) होत आहे. आता एका तरुण शेतकऱ्याने लाल केळीची लागवड करून भरघोस नफा मिळवला आहे.

इंजिनियर तरुण करतोय लाल केळीची शेती
आता करमाळा तालुक्यातील इंजिनियर असलेल्या अभिजित पाटील याने उजनी जलाशयाच्या काठावर असलेल्या जमिनीवर G-9 केळीची लागवड करून कमी खर्चात अधिक नफा मिळवला आहे. भरघोस उत्पादन काढल्याने मोठं मोठे व्यापारी आता बांधावर येऊन केळीची खरेदी करत आहेत. त्याने या लाल केळीची लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

किती मिळाला नफा?
या इलायची केळीसाठी अभिजीत पाटीलला प्रति एकर 12 ते 15 टन उत्पादन मिळाले. तर 50 रुपये किलोप्रमाणे त्याला लाखोंचा नफा मिळाला. त्याने 30 एकरात या केळीची लागवड दर 10 महिन्याला दीड कोटींचे उत्पन्न मिळवत आहे. तुम्ही देखील केळीच्या या जातीची लागवड करून कोट्यवधी रुपये कमावू शकता. अभिजीतने महाराष्ट्रात पहिल्यांदा लाल केली आणि इलायची केळीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

काय आहेत लाल केळीचे फायदे?
लाल केळीत पोटॅशियम जास्त प्रमाणात तर सोडियम कमी प्रमाणात असल्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. रोज दोन लाल केळी खाल्ल्याने कॅन्सर, हृदय विकार, मधुमेह, डोळ्यांचे विकार हे आजार दूर राहतात.

केळीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केळी लागवड विकसित केली आहे. केळीच्या लागवडीबरोबरच रिकाम्या जमिनीत सहपीक म्हणून हळद आणि आल्याची लागवड करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात हे महत्त्वाचे आहे. G-9 केळीची लागवड केळीच्या इतर प्रजातींपेक्षा वेगळी आहे. यामध्ये एका झाडाला 75 किलो केळी मिळेल. तेथे सरासरी 8 पंजे बाहेर पडतात. एका पंजात किमान दोन डझन केळी येतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The young engineer is getting an income of one and a half crores from the cultivation of red banana, know how the management is doing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button