पशुसंवर्धन

Animal New Breed | महाराष्ट्रात सापडल्या गाई आणि म्हशींच्या नव्या जाती; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये..

Animal New Breed | सध्या दुधाची वाढती गरज लक्षात घेता सर्वच पशुधनांमध्ये संकरीकरण झाले. त्यामुळे आता बऱ्याच पशुधनाच्या देशी जाती ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच महाराष्ट्रात प्रामुख्याने म्हशीच्या तीन तर गायीच्या साहा जाती आढळतात. यामध्ये आता म्हशीची पुर्णाथडी जात (Purnathadi Buffalo) आणि गायीच्या कठाणी जातीची (Kathani Cow) भर पडली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो ने म्हशीच्या पुर्णाथडी जातीला आणि गाईच्या कठाणी जातीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या गाइचे आणि म्हशीचे एक स्वतंत्र स्थान निर्माण होऊन महाराष्ट्रातील नोंदणीकृत म्हशींची संख्या ही तीन वरुन चार झाली आहे तर गाईंची संख्या ही सहा वरुन सात झाली आहे.

वाचा: जनावरांची गर्भधारणा तपासण्यासाठी प्रेग्नेंसी किट विकसित! केवळ ‘इतक्या’ दिवसांतच होणार खात्रीशीर तपासणी, जाणून घ्या सविस्तर

पुर्णाथडी म्हशीची वैशिष्ट्ये काय आहेत?

साधारणतः पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी पुर्णाथडी म्हशी आढळून येतात. मध्यम आकारमान, दुधातील उच्च स्निग्धांश, उत्तम प्रजननक्षमता, कमी व्यवस्थापन खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता ही पूर्णाथडी म्हशीमध्ये आहे. त्यामुळे लहान आणि मध्यम पशुपालकांची या म्हशीला पसंती आहे.

कठाणी गाईची वैशिष्ट्ये

साधारणतः गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूरच्या काही भागात ही गाईची जात अढळून येते. तसेच येथील भात शेतीमध्ये याच जातीचे बैल देखील शेतीकामासाठी वापरले जातात. या गाई आकाराने लहान आणि जास्त प्रमाणात पांढऱ्या रंगाच्या असतात. तसेच या जातीमध्ये उष्ण हवामानात तग धरुन राहण्याची क्षमता जास्त आहे.

वाचा: बाप रे! भारतात सर्वाधिक वापरलं जाणाऱ्या ‘पॅरासिटामोल’सह ‘या’ 45 औषधांचा निकृष्ट दर्जाच्या औषधांमध्ये समावेश

नोंदणीकरणामुळे नेमका काय फायदा होईल ?

शासन या जातीवर अधिकृतरित्या गुंतवणूक करेल. त्यामुळे या गाई, म्हशींच्या अर्थकारणाला बळ मिळेल. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या, ब्रीडर्स असोसीएशन तसेच केंद्र सरकारच्या पशुधनाशी संलग्न ज्या काही योजना आहेत त्याचा फायदा या जातीला मिळणार आहे. त्यामुळे पुर्णाथडी जातींच्या संगोपन आणि विकासावर भर दिला जाईल.
या म्हशींवर स्थानिक लोकांचा रोजगार अवलंबून असल्यामुळे अर्थकारणाला बळकटी मिळेल.

नोंदणी झाल्यानंतर काय करणे गरजेचे आहे?

या जातींच्या संवर्धन आणि विकासासाठी विशेष आराखडा तयार करणे गरजेचं आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत त्या त्या भागामध्ये याच्या पशुपैदासकार संघटना तयार होण्यासाठी शासनाचे बळ मिळण्याची देखील आवश्यकता आहे. जेणेकरुन रोजगार वाढेल आणि संवर्धनावर व्यवस्थित काम होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Record of new breed of cow and buffalo in Maharashtra; Learn more about this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button