ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

विक्रमी धान्योत्पादन! देशावरचे संकट शेतकऱ्यांच्या मनगटाने तारल …

Record grain production! Crisis on the country will be solved by the wrists of farmers

कोरोना (Corona) मध्ये सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला असला तरी, देशावर एवढे मोठे संकट आले तरीही शेतकरी राजा मागे हटला नाही, त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून या वर्षी विक्रमी धान्योत्पादन (Record grain production) होईल, असा तिसरा सुधारित अंदाज केंद्र सरकारने (Revised estimates by the Central Government)आज जाहीर केला.

[metaslider id=4085 cssclass=””]

एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा, सगळे उद्योग धंदे ठप्प असताना मात्र शेतकरी (Farmers) राजा त्याच्या शेतामध्ये राबत होता, त्याचेच फळ म्हणून या वर्षी ३०.५४ कोटी टन एवढे विक्रमी धान्योत्पादन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेमध्ये अन्नधान्य यावर्षी ७९.४ लाख टनांनी उत्पादन वाढलेले असून मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ही वाढ २.६६६ कोटी टनांची भर आहे.

या वाढलेल्या धान्यांमध्येगहू, तांदूळ, हरभरा, भुईमुगाचे याचे उत्पदन अधिक आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी शेतकऱ्यांचे आभार मानत याचे श्रेय शेतकऱ्यांना, कृषी शास्त्रज्ञांना (To agricultural scientists) आणि केंद्र सरकारच्या (Of the Central Government) धोरणांना श्रेय दिले आहे. म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी, किसान चे महत्व ओळखून “जय जवान जय किसान” हा नारा लावला लावला होता. त्यांच्या या दूरदृष्टीला आजही बळीराजा सत्यात उतरत आहे.

कितीही संकट आले तरी शेतकरी राजा आपले कर्तव्य कधीच सोडत नाही, असे असले तरीही जगाची भूक मिटवणारा शेतकरी कधी तो त्याच्या कुटुंबाची भूक मिटू शकत नाही, त्यामुळे सरकारने देखील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळवून दिल्यास, तो देखील सुखी होईल.

हे ही वाचा :
1)महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी…

2)प्रश्न तुमचे उत्तर आमचे: अमोल जनार्धन किन्नके यांनी, “शेतकरी गट स्थापना विषयक” विचारलेल्या प्रश्नांचे इतंभूत माहिती फक्त E शेतकरी वर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button