कृषी बातम्या

आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे कांद्याची विक्रमी आवक! वाचा सविस्तर बातमी…

Record arrival of onions at Lasalgaon, Asia's largest onion market! Read detailed news

नाशिक: जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) वाढता
प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्ह्यात कडक निर्बंधाची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे (Of market committees) शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर दि. 24 मे पासुन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. दि.24 मे, ते 21 जुन, या कालावधीत लासलगांव (Lasalgaon) बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार 11 लाख 70 हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली.

हेही वाचा : या” जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

आशिया खंडात कांद्याची (Onions in Asia) अग्रेसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (In the Agricultural Produce Market Committee) गेल्या 27 दिवसात कांद्याची 11 लाख 70 हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत तब्बल 180 कोटी रुपयांची उलाढाल झाली. (Onion market in Lasalgaon Nashik Maharashtra)

हेही वाचा : कापसावरील गुलाबी बोंड आळी ला रोखण्यासाठी CICR ने आणला नवा फॉर्मुला…

मागील वर्षापेक्षा सध्याच्या सरासरी बाजारभावात देखील 700 रूपयांनी वाढ झाली आहे सद्यस्थितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर असुन शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले.

हेही वाचा :


LPG Gas Cylinder मिळणार फक्त नऊ रुपयात! पहा : इंडियन ऑईल व पेटीएम कंपनीची कोणती आहे,’ ही ‘ मोठी ऑफर…

सुखद बातमी: शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत कसा कुठे कराल अर्ज?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button