ताज्या बातम्या

दिलासादायक बातमी, नोव्हेंबर पर्यंत मोफत मिळणार राशन ; वाचा सविस्तर

Reassuring news, rations will be free until November; Read detailed

कोरोना महामारीमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ अनेक मध्यमवर्गीय लोकांना मिळत होता. या योजनेतून मोफत राशन मुळे बऱ्याच कुटुंबाला दिलासा मिळत होता. कोरोना (corona) महामारीमध्ये व लॉकडाऊन मध्ये ,राशन मोफत देऊन मध्यम वर्गीय कुटुंबाना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेने आधार मिळत होता. हा आधार सुटेल यामुळेही लोक चिंतेत होते पण आता ही चिंता मिटली आहे.सर्वसामान्यांचा विचार करून ही योजना नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले आहे.

या योजनेतून 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मोफत देणार असल्याचे सांगितले आहे. महिन्याला 8 टन धान्य उपलब्ध होत असल्याचे सांगितले आहे आणि याचा जवळपास 17 लाख लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच सवलतीच्या दारात गहू तांदूळ दिले जातात. जे धान्य मिळवण्यासाठी तुमचं रेशन कार्ड ऑनलाइन नोंद केलेलं असावं. सोबत 12 अंकी बारकोड मिळालेला असावा.

यासोबत पूरग्रस्त विभागांना देखील पुरवठा विभागाने मोफत 1 किलो डाळ, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर रॉकेलचे राशन देऊन दिलासा दिला इ वाटप केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button