Top10 ‘सुपरफास्ट बुलेटीन’ वाचा, फक्त एका क्लिकवर…
Read Top10 'Superfast Bulletin' with just one click
1) डेल्टा प्लस व्हेरिएंट ने डोकं वर काढल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र , मध्य प्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट (Variant of Concern) जाहीर केलं आहे.
2) गेल्या आठ दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेली घसरण आजही सुरुच आहे. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरला. आज मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,120 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,120 रुपये इतका आहे. चांदी च्या भावात मात्र 200 रुपयांची वाढ झाली
3) राज्यात आज एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.
राज्यात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ! जाणून घ्या; ‘या’ दरवाढी मागची कारणे..
4) सर्वात आधी न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. भारताला 217 धावांवर ऑलआऊट करुन न्यूझीलंडने 249 धावा केल्या आणि भारतावर 32 रनांची आघाडी मिळवली. त्यानंतर भारत आता आपला दुसरा डाव खेळत असून पाचव्या दिवसाखेर भारताची स्थिती 64 वर 2 बाद अशी आहे. सध्या विराट (8) आणि पुजारा (12) खेळत आहेत.WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 6th day reserve day Updates from Southampton ground
5) पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. तर, पावसानं दडी मारल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. (Marathwada 60 taluka facing problem of drought due to lack of Monsoon Rain)
6) रेल्वे प्रशासनानं काही गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
दुधातील फॅट कमी झाले आहेत का? दुधातील फॅट वाढविण्यासाठी करा, ‘ह्या’ उपाय योजना…
7) पेट्रोलचा (Petrol) आजचा दर 103.63 रुपये तर डिझेलचा (Diesel) दर 95.72 रुपये इतका आहे. तर प्रतिलीटर पॉवर पेट्रोलसाठी 107.64 रुपये मोजावे लागत आहेत. आगामी काळात मुंबईतील पेट्रोलचा दर 115 ते 120 रुपये प्रतिलीटर इतका होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविलि आहे.
8) राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यामध्ये ही योजना मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, पेरु, लिंबू व सिताफळ या अधिसूचित पिकांकरीता अधिसूचित महसुल मंडळामध्ये एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत राबविण्यात येत आहे.
“या” ट्रॅक्टरमुळे होणारे शेतकऱ्यांचे भरघोस फायदा! जाणून घ्या सविस्तरपणे…
10) सोयाबीनचे क्षेत्र जास्त असल्याने दुबार पेरणी टाळायची असेल तर बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीनची पेरणी करण्यात यावी, असं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
1. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!
2. “या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…