कृषी सल्ला

पिकांमध्ये “सिलिकॉन” अन्नघटकांची महत्त्वाची कार्य व फायदे वाचा पुढील प्रमाणे…

Read the important functions and benefits of "silicone" nutrients in crops as follows:

ससिलिकॉनमुळे वनस्पतींच्या पेशी पृष्ठभागावर पातळ व टणक थर तयार होतो. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पिकांमध्ये नत्राचा अतिवापर किंवा मॅंगेनीज, फेरस इत्यादी अन्नद्रव्यांच्या अयोग्य वापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यास सिलिकॉनमुळे मदत होते.
योग्य वेळी व योग्य प्रमाणात सिलिकॉन अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पिकांना दुष्काळी परिस्थितीतही तग धरण्याची शक्‍ती मिळते. पीक कणखर होऊन लोळत नाही. सिलिकॉनमुळे पांढरीमुळे निर्मितीला चालना मिळते. तसेच फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाऊन फळाची प्रत सुधारते व टिकवणक्षमता (Improves fruit copy and durability) वाढते. फळांना चकाकी येते

वनस्पती सिलिकॉन कसे घेतात? (How do plants take silicone?)

वनस्पती सिलिकॉन फक्‍त मोनोसिलिसीक ऍसिड किंवा ऑर्थोसिलिसील ऍसिड (Orthosilicoc acid) (H2 Sio4) या स्वरूपात शोषून घेतात. सिलिकॉन मुख्यत्वेकरून मुळाद्वारे पाण्याबरोबर शोषून घेतले जाते, या क्रियेस मास फ्लोस (Mass Floss) असे म्हणतात.

वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये व मुळांमध्ये सिलिकॉन ऑक्‍साइड (siO2) च्या रूपात जमा होतो. तसेच सिलिकॉन झाडांच्या अवयवांमध्ये मोनोसिलिसीक ऍसिड, कोलायडल सिलिसीक ऍसिड (Collodial Silicic acid) अथवा ऑरगॅनोसिलिकॉन पदार्थांच्या (Organosilicone compounds) रूपामध्ये साठून राहतात.

सिलिकॉन प्रथम झाडांच्या शेंड्याकडे साठवण्यात येतो. सर्वात जास्त सिलिकॉन पानांच्या वरच्या थरामध्ये (epiderma cells) साठविले जाते. यामुळे झाडांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्‍ती तयार होते. अजैविक ताणनिर्मित विकृतीपासून झाडांचे संरक्षण होते.

सिलिकॉनच्या कमतरतेचे परिणाम (Consequences of silicon deficiency)
पाने, खोड व मुळे यांची वाढ मंदावते. झाडांची पाने व खोड मऊ व जास्त प्रमाणात खाली झुकलेली राहतात. कणखरता कमी असल्याने पीक लोळण्याचे प्रमाण वाढते. झाडांची रोग व कीड प्रतिकारक क्षमता (Immunity) कमी होते.

प्रकाश संश्‍लेषण क्रियेवर परिणाम… (Effects on photosynthesis.)
उत्पादनात घट,भातामध्ये सिलिकॉनची कमतरता असल्यास उत्पादनामध्ये घट येते.

सिलिकॉन वापराचे फायदे… (Benefits of using silicone) मॅंगनीज व लोह अधिक्‍यामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांची तीव्रता सिलिकॉनमुळे कमी होते. तसेच ऍल्युमिनियमच्या (Of aluminum) अधिक्‍यासाठीही काही प्रमाणात फायदा होतो. झाडामधील जस्त आणि स्फुरद (Phosphorus) यांचा कार्यक्षम वापरासाठीही सिलिकॉन वापरामुळे फायदा होतो. उसामध्ये सिलिकॉन वापरामुळे रोगांचे प्रमाण कमी राहून, उत्पादनामध्ये वाढ होते.

भातामधील आर्सेनिक प्रमाण वाढणे, ही जागतिक समस्या होत आहेत. सिलिकॉनच्या वापराने आर्सेनिक प्रमाण कमी होईल. तसेच नैसर्गिकरीत्या भाताच्या रोग व कीड नियंत्रणास मदत होते. गहू व वांगी या पिकांमध्ये सिलिकॉन वापराने कीड व रोगाला प्रतिबंध झालेला दिसून आला, तसेच उत्पादनाबरोबरच वांग्याचा तजेलदारपणा वाढल्याचे दिसून आले.

हेही वाचा :

1)खुशखबर! मान्सून धडकणार “या” तारखेला..
2)सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button