ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

कोकण कृषी विद्यापीठाचा इस्कॉन सोबत करार याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार वाचा सविस्तर बातमी..

Read the detailed news on how the agreement of Konkan Agricultural University with ISKCON will benefit the farmers.

पालघर : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Balasaheb Sawant Konkan Agricultural University) इस्कॉन (ISKCON) यामध्ये पाच वर्षाचा करार झाला आहे, शेतकऱ्यांच्या (Of farmers) सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यासाठी हा करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एक कराराच्या अंतर्गत शेतीमधील विविध प्रयोग (Various experiments) करण्यात येणार आहेत.

करारांतर्गत (Under contract) कोणते उपक्रम राबवले जाणार आहेत…
या कराराच्या माध्यमातून शेतीमध्ये विविध पिकांवर संशोधन करून त्याचा शेतकऱ्यांसाठी कसा फायदा होईल याचा विचार करण्यात येणार आहे. या करारांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण पुरवणे, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची (Of modern technology) माहिती करून देणे, शेती मालाचे मूल्यवर्धन करणे, (To add value to agricultural commodities) अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भातशेतीसाठी तयार केले ‘हे’ आधुनिक यंत्र! वाचा : यंत्राचे वैशिष्ट्य…

कराराची प्रमुख उद्दिष्टे कोणती… (What are the main objectives of the agreement?)
कोकण कृषी विद्यापीठ व त्यामध्ये पार पडलेल्या करारामध्ये कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, डॉ. पराग हळदणकर (संचालक कृषि संशोधन), ब्रजहरी दास आणि सनतकुमार दास यांनी सामंजस्य करारावर (On a reconciliation agreement) स्वाक्षर्‍या केल्या.या कराराची उ्दिष्टे कोणती आहेत.

  1. सेंद्रिय शेती करने, औषधी वनस्पतींची लागवड करणे.
  2. फळझाडे, फुलझाडे तसेच कपिला जातीच्या गाईचे संवर्धन करने.
  3. या कराराच्या अंतर्गत आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे तसेच सर्वांगिन उन्नती करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  4. बांबूंच्या जातींची लागवड करणे, व त्या निगडीत लघु उद्योग उभारणी करणे.
  5. बारमाही सुगंधी चाफ्याची लागवड आणि त्यापासून अत्तर निर्मिती करण्यास भर देणे.
  6. बीजबँक निर्मिती करणे.
  7. जंगलातील औषधी/ रान भाज्या आणि खाण्यायोग्य फळांची लागवड, संरक्षण आणि संवर्धन करणे,

हे ही वाचा:


1. रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…

2. पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button