कृषी सल्लाहवामान

Agricultural Advice | शेतकऱ्यांनो ‘या’ भागात कोसळणार विजांसह पाऊस, पिकाची काळजी घेण्यासाठी वाचा महत्वपूर्ण कृषी सल्ला

Agricultural Advice | राज्यातील काही भागांत पावसाने उघडीप दिली आहे. तर काही भागांत पाऊस हजेरी लावत आहे. पावसासंदर्भात हवामान विभागाकडून (Meteorological Department) सातत्याने अपडेट दिली जाते. हवामान विभागाकडून आता पूर्व मराठवाड्यात आज विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊन आर्थिक (Financial) नुकसान होऊ नये म्हणून, चला तर मग हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीतील (Agriculture) पिकाची कधी काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

वाचा: पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गामुळे बदलणार शेतकऱ्यांचे नशीब, जाणून घ्या काय होणार फायदा?

पीक नियोजन आणि संरक्षण कृषि सल्ला
• कृषी रसायनांच्या फवारणीचे कामे, उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे आणि आंतरमशागतीची कामे वाफसा आणि हवामान पाहून करावीत.

• सोयाबीन, उडीद व मुग आणि इतर
पिकांची काढणी/कापणी केलेल्या शेतमाल प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा तसेच सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी.

• फळबागा, हंगामी पिके व भाजीपाला पिकाच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचून असल्यास अतिरिक्त पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
• स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे
नियोजन करावे.
• पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
• शेतातील अति महत्वाची कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला
प्राधान्य द्यावे.

वाचा: शेतकऱ्यांनो ‘या’ योजनेंतर्गत नव्या आणि जुन्या विहिरींसाठी मिळतंय अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers, rain with lightning will fall in this area, read important agricultural advice to take care of the crop

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button