कृषी बातम्या

कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती..

Read detailed information on how to start an agricultural service center and its conditions and eligibility.

रासायनिक खते व कीटकनाशके (Chemical fertilizers and pesticides) विक्रीसाठीच्या परवान्यासाठी कृषी व तत्सम शाखांतील पदवी बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्र शासनाने (Central Government) या संदर्भातील अधिसूचना जारी केली असून, त्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी काढले आहेत. औषध विक्रेत्यांच्या धर्तीवर खते व कीटकनाशक विक्रेत्यांसाठी शैक्षणिक (Academic) अर्हता बंधनकारक करण्याचे सरकारचे धोरण आहे.

खते, कीटकनाशकांचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वितरण यासाठी यापूर्वी कृषी किंवा तत्सम शाखांतील शैक्षणिक पात्रता अनिवार्य नव्हती. शेतकऱ्यांना या उत्पादनांविषयी योग्यमार्गदर्शन मिळून त्यांची फसवणूक टळावी या उद्देशाने शैक्षणिक पात्रता बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…

सर्वात प्रथम तुमच्षाकडे अँग्रीकल्चर पदवी/पदवीका (Degree / Degree in Agriculture) झालेले सर्टीफिकीट हवे, ज्या गावामधे चालु करताय तिथला ग्रामपंचायत नाहारकत दाखला (Gram Panchayat Naharkat Certificate), हवा,ज्या दुकान, किंवा गाळ्यामधे व्यवसाय चालवनार तो जर भाडेतत्वावरती असेल तर तस अँग्रीमेंट (Agreement) ( कमीत कमी 11 महिने), तुम्ही खते व ओषधे दोन्हीही विक्री करणार असाल तर तशी दोन्हीचा परवाना वेगवेगळा घ्यायला लागेल,जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी तसेच तेथील जिल्हा परिषद क्रषी विभागाची ही परवाानगी.

अशा वरील गोष्टी महत्वाच्या आहेत, अधिक चांगला व्यवसाय करायचा असेल तर शेतीविषयक नाँलेज , फील्ड विजीट (Field visit) करायची तयारी हवी. चला तर आपण पाहूयात कृषी केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते.

जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…

पात्रता: (Eligibility)
कीटकनाशके तथा खते परवान्या करीता अर्जदार यानी कृषी पदविका 2 वर्षे ( पिक संरक्षण, पिक संवर्धन), बी.एस.सी. (कृषी), बि. टेक., बी.एस.सी.(रसायन शास्त्र या विषया सह) इत्यादी पैकी एक शैक्षणीक अर्हता धारण केलेली असावी.

आवश्यक कागदपत्रे: (Required documents)
परवाना प्रस्तावा मधे खालील प्रमाणे अनुक्रमे कागद पत्रे जोडावित-ऑनलाईन अर्ज, चलान प्रत, शैक्षणिक अर्हता, जागेची कर पावती, ग्रामपंचायत/, नगर पंचायत NOC, भाडे करार नामा,चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, वैध उगम प्रमाणपत्र, आधार कार्ड.

‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर…

कागदपत्रे कुठे सादर करावीत: (Where to submit documents-)
अर्ज कसा करावा-
http://1.6.125.73/ या लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा. प्रिंट काढावी तालुका कृषी अधिकारी कार्यालय ती दाखव करावीत.
अधिक माहिती करता जवळच्या कृषी केंद्र संपर्क साधावा.

हे ही वाचा :

1. तुमचा व्यवसाय आहे का? करा तुमच्या व्यवसायाची येथे जाहिरात आणि मिळवा खात्रीशीर प्रतिसाद

2. ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button