ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

दुपारच्या खास बातम्या आता वाचा पण आणि ऐका पण फक्त एका क्लिक वर…

Read and listen to the special news of the afternoon now but with just one click ...

  1. पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडचा या देशातील चार बिगरभाजप राज्यांनी या निर्णयाशी असहमती दर्शविली आहे. आमच्याकडे कोरोना लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरु करु शकत नाही, असे या राज्यांनी केंद्राला कळवले आहे.

2. अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुख जॅके सुलीवॉन यांच्याशी फोन वर चर्चा नंतर लसीचा कच्चा माल देण्यासाठी नकार देत आडमुटी धोरण अवलंब करणार्या अमेरिकेने आज यासाठी होकार दिला।

हेही वाचा: शेतामध्ये” अशा पद्धतीने घ्या, नवीन वीज जोडणी, संपूर्ण वीज जोडणी प्रक्रियेचा आढावा; फक्त एका क्लिकवर…

3. पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटक येथून येणार आंबा’ कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एच.बी बागवान शेड नं.२, नॅशनल फ्रूट शेड नं.३, लोकमल नारायणदास पंजाबी शेड नं.४ या तीन अडत्याकडून १७,७०० रुपये दंड वसूल केला आहे.

4. मुंबई: लॉकडाऊनमध्ये गरिबांचे अन्नावाचून हाल होऊ नये यासाठी सलमामने किचन सुरू केले आहे. यावेळी स्वतः तिथे जाऊन सलमान खान याने जेवणाची क्वालिटी चेक केली आणि मग वाटपास सुरुवात केली. यावेळी त्याने तब्ब्ल ५००० फूड पॅकेट गरिबांसाठी वाटले.

हेही वाचा: संकटावर मात करत या गावाने रचला अंजीरात “नंबर वन ” होण्याचा मान!

5. जालना: मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटांचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने त्याच्या खात्यातील रक्कम आपल्या अकाऊण्टमध्ये वळवली. आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

6. जालना: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका, जिल्हा प्रशासनानेच या इंजेक्शनचा पुरवठा करावा, असे निर्देश राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा: FACT CHECK : खतांच्या दरांमध्ये वाढ नाही, पहा काय आहे केंद्र सरकार निर्णय!

7. पुणे – गुन्हे शाखेने रेमडेसिव्हर इंजेक्‍शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडू तीन इंजेक्‍शन हस्तगत करण्यात आली. आरोपी इंजेक्‍शनची प्रत्येकी 70 हजाराला विक्री करणार होते.

8. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे। महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये।
– राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button