ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

RBI Payment System | आरबीआय आणणार नवीन पेमेंट सिस्टीम ; इंटरनेट शिवाय पाठवता येणार पैसे

RBI Payment System |बऱ्याचदा इंटरनेट नसेल तर ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करताना आपल्याला अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून सध्या लाईटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर काम सुरू आहे. ही नवीन प्रणाली नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचारग्रस्त भागांत कमीतकमी संसाधनांसह कार्य करेल आणि युजर्सना अगदी सहजरित्या पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मदत करेल. दरम्यान ही सुविधा केव्हा सुरू होईल? याबाबत आरबीआयने अद्याप माहिती दिलेली नाही.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

इंटरनेट शिवाय होणार पेमेंट

सध्या पैसे पाठवण्यासाठी उपलब्ध असणारे सर्व पर्याय माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करतात. या सर्वांना इंटरनेट लागते. यामध्ये UPI, NEFT किंवा RTGS समावेश होतो. इंटरनेट नसेल तेव्हा या सिस्टीम बंद पडतात. मात्र आरबीआयची लाईटवेट पेमेंट सिस्टीम माहिती आणि तंत्रज्ञानावर अवलंबून राहणार नाही. मोबाईल नेटवर्क नसेल किंवा इंटरनेट नसेल तरीसुद्धा तुम्ही या सिस्टीमद्वारे पेमेंट करू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालात दिली माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच २०२२-२३ चा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये बँकेने लाईटवेट आणि पोर्टेबल पेमेंट प्रणालीचा उल्लेख केला आहे. ही प्रणाली कमीतकमी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह काम करणार असून ती फक्त गरजेच्या वेळीच वापरली जाईल. अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या अहवालात देण्यात आली आहे.

देशाची पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही

दरम्यान UPI आणि इतर पेमेंट पद्धतींप्रमाणे, लाईटवेट प्रणाली सर्वांसाठी खुली असणार नाही. ज्यावेळी सध्या उपलब्ध असलेल्या UPI, NEFT किंवा RTGS यांसारख्या सुविधा काम करणार नाहीत. त्याचवेळी ही प्रणाली वापरली जाईल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ही प्रणाली देशाची पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही तसेच ती इकॉनमी लिक्विडिटी पाईपलाईन टिकवून ठेवेल.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हा आहे प्रणालीचा उद्देश

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही प्रणाली सुरू झाल्यामुळे अत्यावश्यक पेमेंट सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. ‘अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवहारांमध्ये मदत करणे’ हाच या प्रणालीचा उद्देश आहे. “युद्धाच्या वेळी बंकर ज्या पद्धतीने काम करतात, त्याच पद्धतीचे काम ही प्रणाली पेमेंट सिस्टममध्ये करणार आहे. या प्रणालीमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डिजिटल पेमेंट आणि आर्थिक बाजारपेठेतील पायाभूत सुविधांवर लोकांचा विश्वास वाढेल.”

RBI will luanch new payment system

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button