RBI Panalty On Bank | नियमांचं उल्लंघन! पाच सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेचा लाखोंचा दंड, तुमची बँक यात आहे का?
RBI Panalty On Bank | Violation of the rules! Five co-operative banks fined lakhs by RBI, is your bank in it?
RBI Panalty On Bank | नियमांचे पालन न केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये मनमंदिर को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई), सन्मित्र को-ऑपरेटिव्ह बँक (पुणे), (RBI Panalty On Bank) लखवार नागरीक सहकारी बँक (मेहसाणा, गुजरात), कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँक (पश्चिम बंगाल) आणि सर्वोदय सहकारी बँक (मुंबई) यांचा समावेश आहे.
केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मनमंदिर को-ऑपरेटिव्ह बँकेला तीन लाख रुपये, कर्ज आणि अॅडव्हान्सबद्दल योग्य माहिती न दिल्याबद्दल लखवार नागरीक सहकारी बँकेला दोन लाख रुपये, केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपये, ग्राहकांकडून मनमानीपणे दंड वसूल केल्याबद्दल सर्वोदय सहकारी बँकेला एक लाख रुपये आणि ठेवी खात्यांची माहिती रोखल्याबद्दल सन्मित्र सहकारी बँकेला एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
वाचा : Bank Withdraws | बँकेने अकारण तुमच्या खात्यातून पैसे काढले तर काय करावे? जाणून घ्या सविस्तर …
आरबीआयने या बँकांवर कारवाई करताना स्पष्ट केले की ही कारवाई नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल केली जात आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि या सर्व बँका नेहमीप्रमाणे काम करत राहतील.
या कारवाईमुळे सहकारी बँकांवर वाढत्या नियंत्रणाची शक्यता निर्माण झाली आहे. आरबीआयने गेल्या काही वर्षांत सहकारी बँकांवर अनेक कारवाई केल्या आहेत.
Web Title :RBI Panalty On Bank | Violation of the rules! Five co-operative banks fined lakhs by RBI, is your bank in it?
हेही वाचा :