RBI | अर्रर्र.. शेतकऱ्यांच्या पैशाला पुन्हा लागणार चुना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, तुमचे तर येथे खाते नाही ना?
RBI | भारतीय रिझर्व्ह बँक देशात कार्यरत असलेल्या सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांच्या (Bank) कामकाजावर लक्ष ठेवते. कोणत्याही बँकेने नियमांचे (Bank Rules) उल्लंघन करताना पकडले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. अलीकडेच आरबीआयने (RBI) दुसऱ्या सहकारी बँकेवर (Cooperative Bank) कारवाई करत बँकेचा परवाना रद्द केला आहे. आता ग्राहकांसह शेतकऱ्यांचे (Agriculture) देखील या बँकेत खाते असल्यास पैसे गुंतणार आहेत.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जदारांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, जाणून घ्या सविस्तर
कोणत्या बँकेचा केला परवाना रद्द?
ही बँक पुणे स्थित सेवा विकास सहकारी बँक आहे. बँक चालवण्यासाठी पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने (RBI Rule) परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी काळात ते पुढे चालविण्यासाठी उत्पन्नाचे (Financial Income) कोणतेही साधन शिल्लक राहिले नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांचे (Customer) हित लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने दिली माहिती
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, 10 ऑक्टोबरनंतर बँक काम करणार नाही. सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, बँकेत जमा केलेल्या ग्राहकांच्या पैशांपैकी 99% रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत येते. DICGC ने सांगितले की, 14 सप्टेंबर 2022 पर्यंत, त्याने ग्राहकांना एकूण 152.36 कोटी रुपयांची विम्याची (Insurance) रक्कम भरली आहे.
बँकेने व्यवहारावर घातली बंदी
बँकेने पैसे ठेवण्यास आणि काढण्यास
बंदी घातली आहे. RBI ने सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथून ग्राहकांचे पैसे काढणे आणि ठेवण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. 10 ऑक्टोबरपासूनच बँकेच्या कामकाजावर बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत ग्राहक बँकेतून पैसे काढू किंवा जमा करू शकणार नाहीत.
ग्राहकांना मिळणार विम्याचे फायदे
ज्या ग्राहकांचे पैसे सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये जमा आहेत त्यांना 5 लाखांच्या ठेवीवर विमा सुविधा मिळते. हा विमा ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) विमा योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे जी सहकारी बँकांच्या ग्राहकांना आर्थिक (Financial Security) सुरक्षा प्रदान करते. अशा परिस्थितीत, खातेधारकाच्या 5 लाखांच्या ठेवीवर, DICGC त्याला संपूर्ण विमा दावा देते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांच्या पिकाचा धोका वाढला! महाराष्ट्रासह देशातील या राज्यांना झोडपणार मेघराजा; हवामान विभागाचा इशारा
- 12व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! सात दिवसांत येणार खात्यात पैसे, एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला मिळणार का नाही?
Web Title: Farmers money will need lime again! RBI has revoked the license of bank, you don’t have an account here?